AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या 3 महिन्यात राष्ट्रवादी पक्ष…. सुजय विखे पाटील यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा

सुजय विखे पाटील राष्ट्रवादी पक्षावर टीका करताना मोठं वक्तव्य केले आहे.

येत्या 3 महिन्यात राष्ट्रवादी पक्ष.... सुजय विखे पाटील यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा
खासदार डॉ.सुजय विखे पाटीलImage Credit source: tv9
| Updated on: Oct 31, 2022 | 5:05 PM
Share

सोलापूर : भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी पक्षावर टीका करताना मोठं वक्तव्य केले आहे. आगामी 3 महिन्यात राष्ट्रवादी पक्ष भाजपात विलीन होईल असा खळबळजनक दावा सुजय विखे पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार? हे अगोदर ठरवावे आणी त्यांनतर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करावे असा टोला देखील त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.

सरकार गेल्याचं दुख: खासदार सुप्रिया सुळे यांना पचवता आलेलं नाही. पचन करणं अवघड झालेलं आहे. मविआ मधील अनेक आमदार आमच्या संपर्कात आले आहेत. त्यांचे आमदार फुटतील याची मोठी भिती त्यांना वाटत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणा बरोबर इंटर्नल सेटिंग केली याचा सर्वांना खुलासा द्यावा असेही सुजय विखे पाटील म्हणाले. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीसह रोहित पवारांवर कडाडून टिका केली आहे.

ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याची घर फोडली त्यांनी घरे फोडण्याची भाषा करू नये असा घणाघात खासदार सुजय विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केला आहे.

राजकारणासाठी त्यांनी लोकांची घर फोडली तरी त्यांचं घर फुटणार नाही अशी त्यांनी अपेक्षा करणं चुकीचं असल्याचं सुजय विखे पाटील म्हणाले.

सुजय विखेंनी शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराची देखील खिल्ली उडवली आहे. शिर्डीला प्रसादलयात जेवण आणि नाष्टा फुकट आहे. खोल्या राहायला मोफत आहे सर्व मोफत असल्याने इथं चिंतन शिबिर घेत असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला.

खासदार सुजय विखे यांनी ठाकरे गटावर महानगरपालिकेचे भ्रष्टाचारावरून टीका करत महानगरपालिकेत शिंदे-फडणीस यांच्या नेतृत्वात सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. अडीच वर्षे यांना सरकार जाईन असं कधी वाटलं नाही, आपण भ्रष्टाचार केला तरी उघडकीस पडणार नाही अस वाटत होते अस विखे यांनी म्हटले.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.