Maharashtra News LIVE : नाशिकमधील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं होणार ‘सुरक्षितता ऑडिट’
Maharashtra News LIVE : शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी पार पडणार आहे. याविषयीचे अपडेट्स आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES
-
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज गुरुवारी पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यातील पक्ष कार्यालयात राज ठाकरे बैठक घेणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
Dhule Pathole : धुळ्यात बसस्थानकात मोठेमोठे खड्डे, प्रवाशांची मोठी कसरत
धुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठमोठे खड्डे झाले आहेद. त्यात पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. खड्ड्यांमधून वाट काढताना प्रवाशांची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात बसचालकांनाही वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास होत आहे. तर अद्याप खड्ड्यांचे डांबरीकरण न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यात बसस्थानकातील खड्डे तातडीने बुजविण्याची प्रवाशांची मागणी आहे.
-
-
Nashik : नाशिकच्या गुन्हेगारांना दणका, 46 सराईत गुन्हेगार तडीपार
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. नाशिकमधील ४६ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. श्रावणासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
-शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात मोहिम हाती घेण्यात आली आहे. -
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांप्रकरणी चौकशी करण्याचे सहकार व पणन विभागाचे आदेश
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहकार आणि पणन विभागाने दिले आहेत. गाळ्यांच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याबाबत माजी सभापती आणि विद्यमान संचालक शामकांत बळीराम सोनवणे यांनी तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत सहकार आणि पणन विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. २०१३ ते २०२६ या कालावधीतील सर्व व्यवहारांची तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं ‘सुरक्षितता ऑडिट’ होणार
नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं ‘सुरक्षितता ऑडिट’ होणार आहे. गडचिरोलीतील आश्रमशाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची सुरक्षितता तपासणी करण्यात येणार आहे. आदिवासी आयुक्तालयाकडून सर्व प्रकल्प कार्यालयांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित ४० आश्रमशाळा, तब्बल २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
-
-
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिटं बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये २० मिनिटं बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्रीपद, दोन आठवड्यात राज्यातील महामंडळ वाटप, शिवसेनेच्या आमदारांना विकासकाम निधी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
-
पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व
पार्थ पवार यांच्याकडून राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्ष पदावर पदाधिकारी निवड केल्यानंतर आता मुंबई अध्यक्ष पदाकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदावर पार्थ पवार यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार झिशान सिद्धकी यांची लवकरच मुंबई अध्यक्ष पदावर निवड होण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर दोन वर्षापासून मुंबई अध्यक्ष पद रिक्त आहे.
विधीमंडळ पक्षाचा एक गट फुटतो, स्वत:ला पक्ष म्हणवतो आणि निवडणूक आयोगाकडे जातो, अशा रीतीने कुठल्याही गटाला मान्यता दिली तर परिस्थिती वादळासारखी विनाशकारी होईल, असा गंभीर इशारा ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान दिला. शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. आज कपिल सिब्बल त्यांचा युक्तीवाद संपवणार आहेत. या युक्तीवादाकडे आज संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.