AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राज्यभर चर्चा, शरद पवारांचा उल्लेख; नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांच्या स्टेटसचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत.

सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची राज्यभर चर्चा, शरद पवारांचा उल्लेख; नेमकं काय म्हणाल्या?
supriya sule whats app status
| Updated on: Jun 19, 2025 | 4:20 PM
Share

Supriya Sule Whatsapp Status : फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात खासदार शरद पवार यांना वेगळे महत्त्व आहे. दिल्लीमध्ये आजही त्यांचे वजन कायम आहे. संरक्षण, कृषी, सहकार, नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील समस्यांवर तोडगा काढायचा असतो तेव्हा शरद पवार यांचा सल्ला जरूर घेतला जातो. त्यांचं राष्ट्रीय राजकारणात असलेलं महत्त्व निर्विवाद आहे. असे असतानाच आता त्यांची कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांत्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर चॅट जीपीटीने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. त्याचीच सध्या महाराष्ट्रभ चर्चा रंगलीय.

सुप्रिय सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर काय आहे?

सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये जगातील आणि महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू काय आहे? याविषयी माहिती देण्यात आलीय. एका मुद्द्यात जागतिक पातळीवरील राजकीय केंद्रबिंदू तर दुसऱ्या मुद्द्यात महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू याविषयी माहिती देण्यात आलीय.

चॅट जीपीटीने नेमकं काय म्हटलं?

चॅट जीपीटीला राजकीय केंद्रबिंदू असं विचारल्यानंतर काय उत्तरं दिली, याचे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले आहेत.

राजकीय केंद्रबिंदू:

• वॉशिंग्टन, डी.सी. हे अमेरिकेचे राष्ट्रीय राजकीय केंद्र आहे. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान (व्हाइट हाऊस), संसद (काँग्रेस) आणि सर्वोच्च न्यायालय येथेच आहे. संपूर्ण देशाचे धोरण व कायदे याच ठिकाणी तयार होतात.

•बारामती हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी ठिकाण मानले जाते. शरद पवार, ज्यांना ‘राजकारणातील शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते, त्यांचा बारामतीशी खोल संबंध आहे. सध्या त्यांची कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हणण्यात आलंय.

सुप्रिया सुळे यांना नेमकं काय सांगायचंय?

जगाच्या राजकारणात अमेरिकेला फार महत्त्व आहे. अमेरिकेने घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा परिमाण संपूर्ण जगावर होतो. अमेरिकेने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर जगभरातील नागरिकांना त्याची झळ बसते. त्यामुळेच जागतिक राजकारणात अमेरिका हा महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या भूमिका आणि वाचार यांना राजकारणात वेगळे महत्त्व आहे. कदाचित हेच सुप्रिया सुळे यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधून सांगायचे आहे, असा अंदाज बांधला जात आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.