AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल

Supriya Sule : आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल
Supriya Sule and Rajnath SinghImage Credit source: X
| Updated on: Jul 19, 2026 | 6:13 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाने राष्ट्रवादीच विलीन व्हावे अशी अट भाजपने टाकली असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. असे झाल्यास दोन्ही पक्षांना केंद्रात 1-1 मंत्रिपद मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांच्या पाया पडत त्यांना अभिवादन केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सर्वपक्षीय बैठकीत गदारोळ

सर्वपक्षीय बैठकीदरम्यान मोठा वाद पाहायला मिळाला. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर विरोधी पक्षांनी बैठकीतून काही काळासाठी वॉकआउट केले. मात्र, सांकेतिक निषेधानंतर सर्व पक्ष पुन्हा बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीनंतर घडला हा प्रसंग

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )च्या कार्याध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळे या सर्वपक्षीय बैठकीसाठी दिल्लीत आल्या होत्या. बैठक संपल्यानंतर त्या बाहेर पडत असताना त्यांची आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट झाली. त्यांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर नेतेही उपस्थित होते होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

NDA मध्ये जाण्याच्या चर्चांना नकार

राजनाथ सिंह यांच्या भेटीपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या NDAमध्ये प्रवेश करण्याच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत विलिनीकरण करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. ‘भारतीय जनता पक्ष किंवा NDA तील कोणत्याही घटक पक्षाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी अशा कोणत्याही प्रस्तावाबाबत संपर्क साधलेला नाही’ असं सुळे यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...