Maratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश दादा पाटील (Suresh Patil) यांनी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapti) यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

Maratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत

सातारा : मराठा समाजाला (Maratha reservation) EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटकांत समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapti) यांची भूमिका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील (Suresh Patil) यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला. (Suresh Patil not agree with the Sambhaji Raje)

संभाजीराजे यांनी EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनीही मान्यही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यातील विसंवाद पुढे येताना दिसत आहे.

संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन सर्वांची मतं घ्यायला पाहिजे होती. काही संघटनांचं ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे, असं सुरेश पाटील म्हणाले.

उदयनराजे असावेत किंवा संभाजीराजे असावेत ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष देतात तिथपर्यंत ठिक आहे. पण नेतृत्व करु नये असं वाटतं. कारण राजेंकडे नेतृत्व असताना त्यांना इतर समाजाचेही प्रश्न सोडवावे लागतील, असंही सुरेश पाटील यांनी नमूद केलं.

EWS बाबत भूमिका चुकीची

सुरेश पाटील म्हणाले, “संभाजीराजे यांनी EWS मागणीबाबत घेतलेली भूमिका चुकीची आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण महत्वाचे आहे. जर सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य केल्या नाहीत, तर महाराष्ट्र बंद करु ”

सुरेश पाटील यांनी मांडलेल्या तीन मागण्या

1 – केंद्रातले दहा टक्के आरक्षण देऊन ते लागू करा अशी आमची मागणी होती.

2 – दुसरी मागणी होती सध्याची नोकर भरती आहे त्याला स्थगिती द्या

3 – काही दिवसापूर्वी 1200 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले ते मागे घ्या.

संभाजीराजे काय म्हणाले?

खासदार छत्रपती संभाजीराजे यांची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसंच मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

यावेळी संभाजीराजेंनी मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWS मधून आरक्षण नको असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. EWSमध्ये आम्हाला तात्पुरतं आरक्षण नको, असं सांगत त्याचे तोटे आम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे तात्काळ आदेश दिले, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

(Suresh Patil not agree with the Sambhaji Raje)

संबंधित बातम्या 

आम्हाला EWS मध्ये आरक्षण नको, संभाजीराजेंची भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ आदेश जारी   

Sambhaji Raje | मेगाभरतीची घाई कशाला? : छत्रपती संभाजीराजे   

गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *