5

‘नशीब फडणवीसांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही…’ शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने कपाळावर हातच….

पंढरपूर येथील कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी भाजप नेते राम कदमांवर टीका केली आहे.

'नशीब फडणवीसांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही...' शिवसेनेच्या 'या' नेत्याने कपाळावर हातच....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 4:14 PM

मुंबईः भारतीय चलनी नोटांवर (Indian Currency) कुणाचा फोटो असावा यावरून सध्या देशात चर्चांना उधाण आलंय. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांच्या (Arvind Kejariwal) वक्तव्यानंतर प्रत्येत विचारधारेचे लोक आपापल्या नेत्याचा फोटो नोटांवर असावा, असे म्हणतोय. भाजप नेते राम कदम यांनी भारतीय नोटांवर नरेंद्र मोदी यांचा फोटो हवा, अशी मागणी केली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पहिल्यांदा एका कार्यक्रमात भारताच्या नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर पंढरपूर येथील कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी भाजप नेते राम कदमांवर टीका केली आहे.

नशीब राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो भारतीय नोटांवर छापण्याची मागणी केली नाही, असं म्हणताना सुषमा अंधारे यांनी कपाळावर हातच मारायचा बाकी ठेवला. त्या पुढे म्हणाल्या, अंध भक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे. हल्या दूध देतो, असे म्हणण्याचा हा प्रकार आहे…

एकनाथ शिंदे सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होत नाहीये. पिकांचा विमा काढणाऱ्या कंपन्यांना कुणाचा वरदहस्त आहे? की या कंपन्या निर्ढावल्या आहेत? 531 कोटी शेतकऱ्यांना कधी मिळतील? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ मुख्यमंत्र्यांचा भाजप कडून टूल म्हणून वापर होत आहे. उप मुख्यमंत्री काड्या करण्यात तसेच 40 बाहुल्यांचा सूत्रे हलवण्यात व्यस्त आहेत, असा आरोप त्यांनी केला.

रवी राणा आणि बच्चु कडू यांच्या पैकी कोण खरे आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं, असं अंधारे म्हणाल्या. चलनी नोटांवरून जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रकार , धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापेक्षा आंतर राष्ट्रीय बाजारात चलनाची पत घसरली आहे. ती अशी सुधारावी. आंतरराष्ट्रीय ताकत होती. ती कुठे आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.

मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर म्हणजे बैल गेला आणि झोपा केला. शेतकरी अडचणीत असताना दही हंडी खेळता.. आरत्या करता, यावरून सुषमा अंधारेंनी सरकारवर टीका केली.

‘आनंदाचा शिधा’ वरून आनंद दिघे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कुणाचे वारसदार आहेत? मोदींचा फोटो लावला पण बाळासाहेबांचा नाही, असा टोमणा सुषमा अंधारेंनी मारला.

Non Stop LIVE Update
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?