तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला? कैसा चलेगा दादा? सुषमा अंधारे ‘त्या’ वक्तव्यांवर ठाम
शिंदे गट सर्वांनाच त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या प्रवेशाआधी त्यांचे काही लोक मलाही संपर्क करत होते, असा गौप्यस्फोटही सुषमा अंधारे यांनी केला.

रणजित जाधव, पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केल्याने ठाण्यात सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल झालाय. मात्र इतर नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष आणि आमच्याविरोधातच गुन्हे कसे दाखल करतात, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. तुम करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढिला? ऐसा कैसा चलेगा दादा, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. टीव्ही 9 शी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ कलम 153 अनुसार दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण होणे असा आहे, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 9 तारखेला माझी सभा झाली. आज पर्यंत कुठलीही दंगल झाली नाही, मग तुम्ही कसं म्हणू शकता हे चिथवणीखोर वक्तव्य आहे?
आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. त्यांना सोडून दिलं. आमदार प्रकाश सुर्वे बोलतात- हातपाय तोडतो… हे उघडपणे हातपाय तोडण्याची भाषा करतात… हे चितावणीखोर वक्तव्य नाही का? तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला” ऐसा कैसे चलेगा दादा? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
शिंदे गट सर्वांनाच त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या प्रवेशाआधी त्यांचे काही लोक मलाही संपर्क करत होते. त्यांनी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे.
साम दाम दंड भेद अशी सर्व नीती शिंदे आणि त्यांचे सहकारी वापरत आहेत. कुटील जटील आणि शकुनी राजकारण म्हटलं जातं ते राजकारण ते करत आहेत त्यांना त्यासाठी शुभेच्छा, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.
ठाण्यातल्या गडकरी रंगायतन येथील एका कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
