सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिहेरी काँटे की लढत होत असताना नवंच चित्र पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र कट्टर प्रतिस्पर्ध्याची अनपेक्षित भेट निवडणुकीपूर्वी कशी असू शकेल […]

सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
Follow us on

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिहेरी काँटे की लढत होत असताना नवंच चित्र पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र कट्टर प्रतिस्पर्ध्याची अनपेक्षित भेट निवडणुकीपूर्वी कशी असू शकेल हा प्रश्न साहजिकच आहे.

सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे.

माझी शेवटची निवडणूक

माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांचेही आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

माझी शेवटची निवडणूक, पवारांची साथ हवी : सुशीलकुमार शिंदे 

तुमची समस्या प्रशांत परिचारकांच्या कानात सांगा, विठ्ठलापर्यंत पोहोचेल : जयसिद्धेश्वर स्वामी  

माढा लोकसभा : दलबदलू नेत्यांची फाईट, कोण जिंकणार?  

ग्राऊंड रिपोर्ट : राज ठाकरेंच्या सभेचा सुशीलकुमार शिंदेंसाठी किती फायदा?    

सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड, बसप पाठोपाठ माकपचाही पाठिंबा