तुमची समस्या प्रशांत परिचारकांच्या कानात सांगा, विठ्ठलापर्यंत पोहोचेल : जयसिद्धेश्वर स्वामी

पंढरपूर: मीच देव आहे असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे सोलापूरचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी हे आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंढरपूरमध्ये आयोजित सभेत एका नागरिकाने स्वामींना गटारीची समस्या सांगितली. तेव्हा विठ्ठलाला जाऊ नका म्हणणाऱ्या स्वामींनी तुमच्या समस्या परिचारकांच्या कानात सांगितली की विठूरायला सांगण्यासारखे आहे असं म्हटलं. हे तेच भाजप आमदार प्रशांत परिचारक आहेत,  ज्यांनी जवानांच्या …

तुमची समस्या प्रशांत परिचारकांच्या कानात सांगा, विठ्ठलापर्यंत पोहोचेल : जयसिद्धेश्वर स्वामी

पंढरपूर: मीच देव आहे असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे सोलापूरचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी हे आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंढरपूरमध्ये आयोजित सभेत एका नागरिकाने स्वामींना गटारीची समस्या सांगितली. तेव्हा विठ्ठलाला जाऊ नका म्हणणाऱ्या स्वामींनी तुमच्या समस्या परिचारकांच्या कानात सांगितली की विठूरायला सांगण्यासारखे आहे असं म्हटलं. हे तेच भाजप आमदार प्रशांत परिचारक आहेत,  ज्यांनी जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

तुमची समस्या परिचारकांच्या कानात सांगितली, तरी ती विठूरायाला सांगण्यासारखं आहे, असं जयसिद्धेश्वर म्हणाले. त्यामुळे प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी केल्याने, सोशल मीडियावरुन जयसिद्धेश्वरांवर टीका होत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जयसिध्‍देश्‍वर महास्‍वामी यांच्‍या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर इथे प्रचारसभेचे आयोजन करण्‍यात आले होते.  याठिकाणी जयसिध्‍देश्‍वर महास्‍वामी यांच्‍या भाषणावेळी एका युवकाने गावातील समस्‍या सांगत, भर सभेत गोंधळ घातला. त्यामुळे सभा आटोपती घेण्‍यात आली.

यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी युवकाची समजूत काढून शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र एकीकडे नागरिक आपल्‍या समस्‍या सांगत असताना, प्रचारसभेसाठी आलेले स्‍टेजवरील नेते आईस्‍क्रीम खाण्‍यात दंग होते.

उमेदवारी जाहीर झाल्‍यापासून भाजपचे उमेदवार पहिल्‍यांदाच पंढरपूर तालुक्‍यात आले होते. मात्र त्‍यांना नागरिकांच्‍या समस्‍यांना सामोरे जावे लागले.

संबंधित बातम्या

ग्राऊंड रिपोर्ट : राज ठाकरेंच्या सभेचा सुशीलकुमार शिंदेंसाठी किती फायदा?   

महाराज, पाच रुपये घेऊन मठात बसा, राजकारणाच्या फंद्यात पडू नका : पवार  

माझी क्लिप अर्धवट व्हायरल केली : जयसिद्धेश्वर स्वामी  

EXCLUSIVE मीच देव म्हटलं नाही, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचं स्पष्टीकरण  

‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’ 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *