AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे एक वक्तव्य सध्या तुफान गाजत आहे. हे वक्तव्य ऐकल्यावर तुम्हाला ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘गणेश गायतोंडे’ आठवल्याशिवाय राहणार नाही. सेक्रेड गेम्समध्ये ज्याप्रकारे गणेश गायतोंडे ‘अपुनिच भगवान है’ असे म्हणतो, त्याप्रमाणे भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणतात, ‘कुठेही देवदर्शनाला जा, तुम्हाल देव भेटणारच नाही, कारण […]

'अपुनिच भगवान है'... सोलापुरात भाजपचा 'गणेश गायतोंडे'
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे एक वक्तव्य सध्या तुफान गाजत आहे. हे वक्तव्य ऐकल्यावर तुम्हाला ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘गणेश गायतोंडे’ आठवल्याशिवाय राहणार नाही. सेक्रेड गेम्समध्ये ज्याप्रकारे गणेश गायतोंडे ‘अपुनिच भगवान है’ असे म्हणतो, त्याप्रमाणे भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणतात, ‘कुठेही देवदर्शनाला जा, तुम्हाल देव भेटणारच नाही, कारण मीच देव आहे’.

कुठेही देवदर्शनला जाऊ नका, करण मीच देव आहे, असा दावा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केला आहे. तशी त्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. हे जयसद्धेश्वर महास्वामी दुसरे-तिसरे कुणी नसून, सोलापुरातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात हे भाजपचे ‘गणेश गायतोंडे’ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नेमकं काय म्हणाले भाजपचे ‘गणेश गायतोंडे’?

“14 ते 18 एप्रिलच्या दरम्यान सुट्टीचे दिवस आहेत. सुट्टीच्या काळात अनेकजण देवदर्शनासाठी किंवा सहलीला जातात. मात्र आपण देवदर्शनासाठी गेलात तरी देव आपल्याला भेटणार नाही, भेटला तरी बोलणार नाही, आपले पैसे फुकट जातील, वाया जातील. त्यामुळे आपण देवदर्शनाला जाऊ नका, कारण मीच देव आहे.”, असं वक्तव्य सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले आहे.

सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामींकडे 3 कोटींची संपत्ती, मात्र पॅनकार्ड नाही!

दरम्यान, जयसिद्धेश्वर महाराजांच्या या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. स्वतःला देव मानून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.