AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराज, पाच रुपये घेऊन मठात बसा, राजकारणाच्या फंद्यात पडू नका : पवार

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असताना, यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराजांवर निशाणा साधला आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असा सल्ला शरद पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना दिला […]

महाराज, पाच रुपये घेऊन मठात बसा, राजकारणाच्या फंद्यात पडू नका : पवार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असताना, यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराजांवर निशाणा साधला आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असा सल्ला शरद पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.

‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’    

“साधू-संत कुणाकडे काहीही मागत नाहीत. मागणारा कधीच संत होऊ शकत नाही. मात्र सोलापुरातील महाराज मते द्या म्हणून फिरत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली. मी कोणत्याच महाराजांचा अनादर करत नसल्याचं म्हणत, शरद पवारांनी पुढे लोकसभेत निवडून आलेल्या महाराज मंडळींचा चांगलाच समाचार घेतला.

भाजपने निवडणूक रिंगणात उतरवून आठ-दहा महाराज निवडून आणले. निवडून आणलेले महाराज भगवे घालून संसदेत बसले खरे, मात्र संसदेत एखादाही तोंड उघडले नसल्याची टीका पवारांनी केली.

55 मठ, 9 गुरुकुल, 200 एकर जमीन, शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात

सोलापुरातील महाराज मठात जायचं सोडून इकडे कुठे चाललात, असा टोलाही लगावला. “महाराजांना विचारल्यावर परमेश्वर की कृपा है, आज बेहत्तर है, कल या परसो बेहत्तर होगा, सबका कल्याण करेंगे, असे महाराज म्हणत आहेत. मात्र इकडे प्यायला नाही. तरुणांना नोकरी नाही, त्याचं काय?” असा सवाल शरद पवारांनी केला.

VIDEO : पाहा शरद पवार काय म्हणाले?

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.