सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड, बसप पाठोपाठ माकपचाही पाठिंबा

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना बहुजन समाज पक्षानंतर (बसप) आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही (माकप) आपला पाठिंबा जाहीर केलाय. विशेष म्हणजे हे दोन्हीही पक्ष वंचित बहुजन आघाडीचे घटक पक्ष नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासह भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. मात्र, येथील निवडणुकीत […]

सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड, बसप पाठोपाठ माकपचाही पाठिंबा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना बहुजन समाज पक्षानंतर (बसप) आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही (माकप) आपला पाठिंबा जाहीर केलाय. विशेष म्हणजे हे दोन्हीही पक्ष वंचित बहुजन आघाडीचे घटक पक्ष नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासह भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. मात्र, येथील निवडणुकीत तिहेरी लढत होईल, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

बसप आणि माकप वंचित बहुजन आघाडीच्या धोरणाशी पूर्णपणे सहमत नाही. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी पाठिंबा दिल्याची भूमिका या पक्षांनी घेतली आहे. या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यामुळे सोलापूर मतदारसंघातील प्रकाश आंबडेकर यांचे पारडे आणखी जड झाले आहे.

बहुजन समाज पक्षाचे उमेदवार राहुल सरवदे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी बसपकडून उमेदवारी अर्ज भरताना बसपच्या कार्यकर्त्यानी आणि नगरसेवकांनी विरोध केला होता. मात्र, बसपच्या राहुल सरवदे यांनी पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांची भावना आणि प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी दलित समाजातील कार्यकर्त्यांनी केलेली जनजागृती पाहता अखेर सरवदे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरल्याने अनेक दलित संघटना एकत्र

प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरल्यापासून विविध गटातटात काम करणाऱ्या दलित संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने मतांचा ओघ आणण्यासाठी बसपनेही उमेदवारी मागे घेतली. बहुजन समाज पक्षाचे सोलापूर येथे 3 नगरसेवक आहेत. शिवाय प्रत्येकवेळी बसपकडून येथे लोकसभा लढवली जाते. मात्र, आता प्रकाश आंबडेकरांना पाठिंबा दिल्यामुळे आंबेडकरी चळवळीची ताकद वाढलेली दिसत आहे. बसपच्या पाठोपाठ आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीत झालेल्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापुरात नुकतेच नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत जाऊन त्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे भाजपशी त्यांचे सुत जुळल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदार संघात माकपच्या नरसय्या आडम यांच्या माकपच्या हक्काची मते भाजपला मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत माकपने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

माकप आणि प्रकाश आंबेडकरांची आजवर सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक संयुक्त आंदोलने

माकप आणि प्रकाश आंबेडकर यांनी आजवर एकत्रितपणे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक संयुक्त आंदोलने केली  आहेत. महाराष्ट्रातील जमिनीचा प्रश्न, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागास समाजावर होणारे अन्याय-अत्याचार, उना, सहारनपूर आणि देशभरात दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले, हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या या प्रश्नांवर आपण संयुक्तपणे प्रखर आंदोलने केली आहेत. त्यामुळेच आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे माकपकडून सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकरांसाठी रिपाइंचे काही गट, बसप आणि दलित चळवळीतील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सर्व गट-तट विसरून सर्वजण एकत्र आल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिक ‘माझ्या भीमाचं रक्त’ म्हणून प्रकाश आंबेडकरांना पाहायला येत आहेत. त्यामुळे दलित जनतेची ही भावना काँग्रेसची चिंता वाढवणारी आहे. कारण दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची वोटबँक राहिली आहे. मात्र, प्रकाश  आंबेडकरांच्या निमित्ताने त्यालाच सुरूंग लागला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.