AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाची मोठी खेळी; अंधारे बॅकफूटवर जाणार?

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाची मोठी खेळी; अंधारे बॅकफूटवर जाणार?
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 13, 2022 | 11:08 AM
Share

ठाणे: ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अंधारे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद दिलं. सुषमा अंधारे यांनी या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं.

विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांच्या रडारवर शिंदे गट आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला.

त्यामुळे शिंदे गटाची पळताभूई थोडी झाली आहे. त्यामुळेच शिंदे गटाने सुषमा अंधारे यांना टेन्शन देण्यासाठी वैजनाथ वाघमारे यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न करून मोठी खेळी केली आहे.

शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला आता सुषमा अंधारे कशा उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर वैजनाथ वाघामारे हे सुषमा अंधारे यांच्यासारखीच आक्रमक भूमिका मांडतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....