झोपडीत राहत सायकलने प्रवास करणारे ‘ओदिशाचे मोदी’ केंद्रीय मंत्रिपदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांच्या मंत्रीमंडळाने गुरुवारी (30 मे) मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात 57 खासदारांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात एक नाव अधिकच चर्चिले गेले. ते आहे ओदिशातील खासदार प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) यांचे. प्रताप चंद्र सारंगी आपल्या साध्या […]

झोपडीत राहत सायकलने प्रवास करणारे 'ओदिशाचे मोदी' केंद्रीय मंत्रिपदी
Follow us
| Updated on: Jun 01, 2019 | 2:08 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांच्या मंत्रीमंडळाने गुरुवारी (30 मे) मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात 57 खासदारांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात एक नाव अधिकच चर्चिले गेले. ते आहे ओदिशातील खासदार प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) यांचे.

प्रताप चंद्र सारंगी आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. सारंगी एका झोपडीत राहतात आणि सायकलवरुन प्रवास करतात. लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सारंगी यांचे विरोधी उमेदवार कार आणि इतर मोठ्या वाहनांच्या आधारे प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी सायकलवरुन प्रचार केला. पुढे अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी एक रिक्षा भाड्याने घेतली. एवढ्या क्षुल्लक संसाधनांचा उपयोग करुनही त्यांनी करोडपती उमेदवारांना पराभूत केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बालासोर लोकसभा मतदारसंघातून बीजू जनता दलाच्या रविंद्र कुमार जेना यांचा 12 हजार 956 मतांनी पराभव केला. जेना यांची संपत्ती 72 कोटींची आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे ओदिशा प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक यांचा मुलगा निरंजनज्योती पटनाईकही निवडणूक मैदानात होते. त्यांची एकूण संपत्ती 104 कोटी एवढी होती. दुसरीकडे सारंगी यांची जंगम मालमत्ता 1.5 लाखांची तर स्थावर संपत्ती 15 लाख रुपयांची आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधन पेंशन आणि शेती आहे.

लोकसभेतील विजयानंतर सोशल मीडियावर व्हायरल

लोकसभेतील विजयानंतर सारंगी दिल्लीला येण्यासाठी आपल्या बांबूच्या झोपडीत बॅग भरतानाचा एक फोटोही मध्यंतरी बराच व्हायरल झाला. त्या फोटोत सारंगी एका साध्या पिशवीत आपले काही दैनंदिन सामान भरत होते. त्यातून त्यांचा साधेपणा स्पष्टपणे दिसत होता. सारंगींना ओडिशाचे मोदी असेही म्हटले जाते. जेव्हा ते दिल्लीत राष्ट्रपती भवनातील शपथविधीत शपथ घेण्यासाठी समोर आले तेव्हाही उपस्थित भाजप नेत्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत टाळ्यांचा कडकडात केला. एवढेच नाही तर भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनीही त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

प्रताप सारंगींना साधु बनायचे होते

64 वर्षीय प्रताप चंद्र सारंगी यांना साधु होत एकांतात जीवन जगायचे होते. त्यासाठी ते रामकृष्ण मठात गेलेही. मात्र, तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आईची सेवा करण्यास सांगण्यात आले. पुढे ते त्यांच्या गावाकडे परतल्यावर हळूहळू सामाजिक कामात सहभागी होत गेले. त्यानंतर त्यांनी परिसरात आपल्या सामाजिक कामासह साध्या राहणीमानातून वेगळा ठसा उमटवला. उडिया आणि संस्कृतवर प्रभुत्व असलेले सारंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जवळून संबंधित आहेत.

सामाजिक प्रश्नावर अनेक आंदोलने

विशेष म्हणजे सारंगीविरोधात एकूण 7 फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे. सारंगी दारुबंदी आणि शिक्षणासारख्या स्थानिक प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये नेहमीच सहभागी राहिले आहेत. त्यांनी शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी आदिवासी गावांमध्ये गण शिक्षा मंदिर योजनेअंतर्गत बोलासोर आणि मयुरभांज जिल्ह्यात साम्रकला केंद्रांची स्थापना केली. चिटफंड घोटाळ्याबाबतही ते आक्रमक होते. त्यांनी या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीवरही प्रश्न उपस्थित केले होते.

जेव्हा सारंगींचे निवडणूक तिकिटच हरवते…

हे ऐकायला काहीसे वेगळे वाटेल पण एका निवडणुकीत सारंगींकडून पक्षाने दिलेले तिकिटच हरवले होते. सारंगी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. भाजपने याआधी राज्यातील निवडणुकीत त्यांना उमेदवार म्हणून तिकिट दिले. मात्र, त्यांनी ते तिकिट आपल्या बॅगमध्ये ठेवले आणि प्रवासात ते हरवले. त्यामुळे निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसई त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज केला.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सारंगी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचेही सदस्य आहेत. याआधी ते 2004 आणि 2014 मध्ये दोनदा ओडिशा विधानसभेवरही निवडून गेले आहेत. सारंगी यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्पित कार्यकर्ते आहेत. ते ओडिशा बजरंग दलाचे अध्यक्षही राहिले आहेत. तसेच विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

सारंगी यांच्यावरील गंभीर आरोप

सारंगी यांच्यावर अनेक गंभीर आरोपही आहेत. जानेवारी 1999 मध्ये ओदिशात ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्राहम स्टेन आणि त्यांच्या 2 मुलांची जीवंत जाळून हत्या करण्यात आली होती. स्टेन आपल्या 7 आणि 11 वर्षांच्या दोन्ही मुलांसह मनोहरपूर गावात गाडीत झोपलेले  होते. त्यावेळी त्यांची गाडी पेटवून देण्यात आली. या हत्येत प्रमुख आरोपी बजरंग दलाशी संबंधित व्यक्ती होत्या. त्यावेळी सारंगी ओदिशातील बजरंग दलाचे प्रमुख होते. याप्रकरणी सारंगी यांची चौकशीही झाली. मात्र, त्यांनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगितले. त्यावेळी विरोधीपक्षाच्या वकिलांनी त्यांची पडताळणी केली नाही, असाही आरोप झाला.

सारंगी बजरंग दलाचे प्रमुख असताना आदिवासींचे धर्मपरिवर्तन करुन त्यांना ख्रिश्चन केले जात असल्याचा प्रचार करण्यात आल्याचाही आरोप सारंगींवर झाला आहे. सारंगी यांनी स्वतः आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर 7 गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरु असल्याचे नमूद केले आहे. त्यात धमकावणे, दंगल घडवणे, धर्म आणि वंशाच्या आधारे समाजात द्वेष पसरवणे या खटल्यांचाही समावेश आहे. यातील अनेक प्रकरणे तर भाजप-बीजदच्या युती सरकारच्या काळात दाखल झाली आहेत.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.