AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या विवेक वेलणकरांवर कारवाई करा : रावते

मुंबई : पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. विवेक वेलणकर यांनी हेल्मेटसक्तीला विरोधक केला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्णयाला विरोध केल्याने दिवाकर रावते यांनी थेट विवेक वेलणकरांवरच कारवाईच बडगा उचलला आहे. गेल्या वेळी पुण्यात पोलीस आयुक्तांनी हेल्मेटबाबत कायदेशीर अंमलबजावणीसाठी आवाहन केलं होतं. […]

हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या विवेक वेलणकरांवर कारवाई करा : रावते
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

मुंबई : पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. विवेक वेलणकर यांनी हेल्मेटसक्तीला विरोधक केला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्णयाला विरोध केल्याने दिवाकर रावते यांनी थेट विवेक वेलणकरांवरच कारवाईच बडगा उचलला आहे.

गेल्या वेळी पुण्यात पोलीस आयुक्तांनी हेल्मेटबाबत कायदेशीर अंमलबजावणीसाठी आवाहन केलं होतं. पुणेकरांनी हेल्मेट का घालावा हा वाद घातला गेला. लोकांचा जीव वाचावा, हा मूळ हेतू आहे, असेही दिवाकर रावते म्हणाले. तसेच, हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे, कायद्याच्या अंमलबजावणीचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना आदेश दिलेत, असेही रावतेंनी यावेळी सांगितले.

“नागरिक मंच नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असतात. तिथल्या प्रमुखांनीच विरोध करणं चुकीचं आहे. हेल्मेटलासक्ती का केली जाते, असा प्रश्न त्यांनी (विवेवक वेलणकर) विचारला, हे चुकीचं आहे. दुचाकीवरुन सर्वाधिक अपघात होतात.” असे म्हणत दिवाकर रावते पुढे म्हणाले, “मी बैठकीत या सजग नागरिक मंचाच्या पदाधिकाऱ्यावर (विवेक वेलणकर) कारवाई करा”

“पुणे सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. म्हणून पुणेकरांनी विनंती हेल्मेटबाबत पुढाकार घ्यावा. नितीन गडकरींनी दिलेले आदेश आहेत. पुणेकर भाजपला निवडून देतात, तर भाजप मंत्र्यांच्या निर्णयाला ते मान्य करतील असं वाटतं.” असेही दिवाकर रावते म्हणाले.

दारु पिऊन वाहन चालवल्यास परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. तर विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या  बैठकीत वाढते अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.