तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्यावर?; तातडीने तेलंगणासाठी जाणार

K Chandrashekar Rao V/s Revanth Reddy Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील बडा नेता मैदानात... विशेष विमानाने तेलंगणाला रवाना होणार. दुसरीकडे कुणी व्यक्त केलाय काँग्रेसच्या विजयाचा दावा? वाचा सविस्तर बातमी...

तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्यावर?; तातडीने तेलंगणासाठी जाणार
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 9:48 AM

सागर सुरवसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी हैद्राबाद | 03 डिसेंबर 2023 : आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाचा निकाल लागतोय. तेलंगणामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. काँग्रेसने सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे आणि अशातच आता तेलंगणाच्या सत्तास्थापनेची धुरा महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अनुभवी नेते म्हणून कर्नाटक नंतर तेलंगणातील सत्ता स्थापनेची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर येण्याचा काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास असल्याने निकालापूर्वीच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

तेलंगणाच्या मदतीला महाराष्ट्रातील नेता

तेलंगणामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. काँग्रेसने केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला तगडी फाईट दिली. पण त्यामुळे जर काँग्रेसला जर विजय मिळाला तर सत्तास्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यावर देण्यात येण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे ही धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी थोड्याच वेळात सुशीलकुमार शिंदे विशेष विमानाने तेलंगणाला रवाना होणार आहेत.

“विजयाचा गुलाल काँग्रेसच उधळणार”

तेलंगणाचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तेलंगणामध्ये विजयाचा गुलाल काँग्रेसच उधळणार आहे, असा विश्वास तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. तेलंगणामध्ये काँग्रेस 70 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल. मुख्यमंत्री केसीआर यांनी राजेशाही असल्याप्रमाणे फार्महाऊसवरून सरकार चालवलं. दहा वर्षात 10 वेळाही केसीआर मंत्रालयात आले नाहीत. दहा वर्षात कोणतेही काम केलं नाही. याचा जनतेमध्ये रोष आहे. तो या निकालातून दिसणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

लोकांच्या मनातील नाराजी या निवडणुकांच्या माध्यमातून दिसून येत आहे. आमदार पळवापळवीचा प्रकार तेलंगणामध्ये होण्याचा प्रश्नच येत नाही. एकतर्फी बहुमताने आम्ही विजयी होऊ. हा तेलंगणाच्या जनतेचा विजय असेल, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.