AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजप, राष्ट्रवादीतील वाद शिगेला, चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटसाठी नगरसेवकांचा प्रस्ताव, वातावरण तापलं

पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचा विकासनिधी देखील शून्य करण्यात आला आहे.

पुण्यात भाजप, राष्ट्रवादीतील वाद शिगेला, चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटसाठी नगरसेवकांचा प्रस्ताव, वातावरण तापलं
chandrakant patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 9:37 AM
Share

पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहचल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचा विकासनिधी देखील शून्य करण्यात आला आहे. या दोन्ही नगरसेवकांकडून भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट व्हावं यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. आधी अमोल बालवडकर यांचा विकास निधी शून्य करण्यात आला होता, त्यानंतर आता सुहास टिंगरे यांना देखील मोठा धक्का बसला आहे, त्यांचा विकास निधी देखील शून्य करण्यात आला आहे, त्यामुळे यावरून आता पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे.

नेमकं काय म्हणाले सुहास टिंगरे?

चंद्रकांत पाटील यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडून करण्यात आली होती, आणि तुम्ही अनुमोदक म्हणून त्या प्रस्तावावर सही केली होती, त्यामुळे तुमचा विकास निधी शून्य करण्यात आला का? असा प्रश्न यावेळी सुहास टिंगरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुहास टिंगरे यांनी मोठं विधान केलं आहे, मला तशीच शक्यता वाटते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माझं दुसरं म्हणणं असं आहे की, आमचे दिवंगत स्वर्गीय नेते अजितदादा पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगला कारभार सांभाळला, ते पुण्याचे पालकमंत्री देखील होते. त्यांच्यावर देखील अनेक आरोप झाले, सत्तर हजार कोटींचा आरोप झाला. परंतु आरोप झाले म्हणून अजित पवार यांनी असं कधीच केलं नाही, त्यांनी कोणत्या आमदाराचा, खासदारांचा एक रुपयांचा देखील निधी गोठवला नाही. सुहास टिंगरे म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल वैयक्तिक आकस असू शकतो, परंतु त्या बारा कोटी रुपयांमधून मी सर्वसामान्य लोकांची काम करणार होतो. माझ्या प्रभागातील अनेक कामं प्रलंबित आहेत, असंही यावेळी सुहास टिंगरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात आणि केंद्रात भाजप आणि आमच्या पक्षाची युती आहे. मात्र पुणे महापालिकेत आम्ही विरोधी पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही पुण्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही, असंही यावेळी सुहास टिंगरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा