ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं, गृह-अर्थ मंत्रालय कोणाकडे?

उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं, गृह-अर्थ मंत्रालय कोणाकडे?
Follow us
| Updated on: Dec 04, 2019 | 10:15 AM

मुंबई : ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सहा मंत्र्यांना आज खातेवाटप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हं (Thackeray Government Ministry) आहेत. गृह मंत्रालयाची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे सोपवायची, हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालयाचीच धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला एकूण 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदं मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय ही मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या वाट्याला रस्ते विकास, आरोग्य यासारख्या मंत्रिपदांचा कार्यभार येऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार (Thackeray Government Ministry) होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.