मुख्यमंत्र्यांनी चोरी छुपके स्थापन केलेले सरकार टिकणार नाही : नवाब मलिक

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चोरी चोरी छुपके सरकार स्थापन केले आहे, ते टिकणार नाही, आम्ही त्यांचा पराभव करु," असे नवाब मलिक यावेळी (ncp mla meeting in mumbai) म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी चोरी छुपके स्थापन केलेले सरकार टिकणार नाही : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 23, 2019 | 10:36 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप (ncp mla meeting in mumbai) झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची एक बैठक आयोजित करण्यात (ncp mla meeting in mumbai) आली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर नेत्यांसह आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबची माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चोरी चोरी छुपके सरकार स्थापन केले आहे, ते टिकणार नाही, आम्ही त्यांचा पराभव करु,” असे नवाब मलिक यावेळी (ncp mla meeting in mumbai) म्हणाले.

“अजित पवारांनी राज्यपालांना हजेरीसाठी घेतलेले सह्यांचे पत्र दिलं.त्याला बहुमताचे पत्र जोडून हे सरकार शपथविधी करण्यात आला. भाजपला 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली. मला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होईल. त्यावेळी स्पीकरच्या निवडणुकीत आम्ही त्यांना पराभूत करु,” असा विश्वासही नबाव मलिक यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय एकमताने देण्यात आला. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पक्षाविरोधी असल्याने त्यांना त्या पदावरुन हटवण्यात आले,” असेही नवाब मलिक (ncp mla meeting in mumbai) म्हणाले.

“पुढचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व घटनात्मक अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत,” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

“राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी पाच आमदारांशी आमचा संपर्क झालेला नाही. तर सहा आमदार उद्या सकाळपर्यंत मुंबईला पोहोचतील. उरलेले सर्व आमदार पक्षाच्या बैठकीला हजर होते,” असे नवाब मलिक म्हणाले.

“राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल. आमचे आमदार मुंबईत राहणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसचेही आमदार मुंबईत येतील,” असेही त्यांनी (ncp mla meeting in mumbai) सांगितले.

दरम्यान आमदार फुटीच्या भितीने राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून एका बसमधून राष्ट्रवादीचे 42 आमदार पवईतील हॉटेलमध्ये जाण्यासाठी रवाना होणार आहेत. आमदार फुटीच्या भितीने सर्व आमदारांना एकाच बसमधून हॉटेलकडे रवाना झाले आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.