EXCLUSIVE: कुणाचं तिकीट कापणार? महाराष्ट्र भाजप खासदारांची यादी मागवली

EXCLUSIVE: कुणाचं तिकीट कापणार? महाराष्ट्र भाजप खासदारांची यादी मागवली

नवी दिल्ली: भाजपने महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगती पुस्तक मागवून घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने महाराष्ट्रातील भाजप खासदारांची संसदेतील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांचा अहवाल आणि संसदीय बैठकीतील उपस्थिती याचा लेखाजोखा संसदेच्या पटल कार्यालय म्हणजेच टेबल ऑफिसकडून मागवला आहे. त्याबाबतची माहिती मोदींच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा एक अहवाल तयार करणार आहे. त्यावरुन […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली: भाजपने महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगती पुस्तक मागवून घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने महाराष्ट्रातील भाजप खासदारांची संसदेतील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांचा अहवाल आणि संसदीय बैठकीतील उपस्थिती याचा लेखाजोखा संसदेच्या पटल कार्यालय म्हणजेच टेबल ऑफिसकडून मागवला आहे. त्याबाबतची माहिती मोदींच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा एक अहवाल तयार करणार आहे. त्यावरुन येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या खासदाराला पुन्हा पक्षाचे तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, याबाबतची माहिती पीएमओतील अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देतील. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे.

महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा अहवाल मागवल्याच्या वृत्ताला संसदीय पटल कार्यालयाने दुजोरा दिला आहे. येत्या 10 दिवसात सर्व खासदारांचे रिपोर्ट संसदीय पटल कार्यालय हे  पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करणार आहे.

महाराष्ट्रातील भाजप खासदार

1 ए.टी नाना पाटील, जळगाव,लोकसभा

2 अनिल शिरोळे, पुणे,लोकसभा

3 अशोक महादेवराव नेते,गडचिरोली- चिमूर,लोकसभा

4 दिलीप कुमार मनसुखलाल गांधी,अहमदनगर,लोकसभा

5 गोपाल चिनया शेटटी, मुंबई उत्तर ,लोकसभा

6 हंसराज गंगाराम अहिर,चंद्रपूर,लोकसभा

7 हरिशचंद्र देवराम चव्हाण, दिंडोरी,लोकसभा

8 हीना विजयकुमार गावित, नंदूरबार,लोकसभा

9 कपिल पाटील, भिवंडी,लोकसभा

10 किरिट सोमय्या, मुंबई उत्तर पूर्व, लोकसभा

11 नितीन गडकरी, नागपूर,लोकसभा

12 पुनम महाजन, मुंबई उत्तर मध्य, लोकसभा

13 प्रितम गोपिनाथ मुंडे, बीड ,लोकसभा

14 रक्षा निखील खडसे, रावेर ,लोकसभा

15 रामदास तडस,वर्धा ,लोकसभा

16 रावसाहेब दानवे पाटील, जालना,लोकसभा

17 संजय श्यामराव धोत्रे, अकोला ,लोकसभा

18 संजयकाका पाटील, सांगली, लोकसभा

19 शरद बनसोडे ,सोलापूर ,लोकसभा

20 सुभाष रामराव भांबरे, धुळे ,लोकसभा

21 सुनिल बलिराम गायकवाड, लातूर ,लोकसभा

22 – राजेंद्र गावित – पालघर लोकसभा

या सर्व खासदारांचा अंतिम अहवाल पंतप्रधान कार्यालय तयार करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द करणार आहे. या अहवालावरच महाराष्ट्रातील भाजप खासदारांची उमेदवारी ठरणार आहे. या अहवालामध्ये नेमकं काय असणार आहे, यावरच महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे भवितव्य अवलंबून असेल.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें