Eknath Shinde : शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसी मैदानावर ..! बैठकीत होणार निर्णय

दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री यांनी दसरा मेळाव्याबाबत स्पष्ट भूमिका ही घेतलेलीच नव्हती.

Eknath Shinde : शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसी मैदानावर ..! बैठकीत होणार निर्णय
शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे.
| Updated on: Sep 13, 2022 | 6:45 PM

मुंबई : यंदा (Dussehra Rally) दसरा मेळाव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. आतापर्यंत (Shiv Sena) शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच झाला आहे. शिवाय त्याला 56 वर्षांची परंपरा आहे. यावेळी मात्र, शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला होता. पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करता आता (Eknath Shinde) शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदे गटाने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

बैठकीत होणार निर्णय..!

दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याबाबत स्पष्ट भूमिका ही घेतलेलीच नव्हती. अद्याप अवधी असल्याचे कारण देत त्यांनी टाळाटाळ केली होती. पण आता शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याचे समजत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद

शिवसेनेतील आमदरांनी बंड केल्यापासून राज्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरु आहेत. यातच शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा यावरुन राजकारण तापले होते. आपलीच खरी शिवसेना असा दावा करीत शिंदे गटानेही महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करून शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसीवर होणार आहे.