AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या मर्सिडिजला नेमकं काय झालं होतं? हाँगकाँगची टीम ठाण्यात!

अपघातामधील मर्सिडिज कार ही आता ठाण्यातील शोरुममध्ये आणण्यात आली आहे. शिवाय मर्सिडिज कंपनीने प्राथमिक अहवाल दिल्यानंतरच हाँगकाँगमधील तज्ज्ञांची टीम तपासासाठी 12 सप्टेंबर रोजी येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी ही टीम ठाणे येथे दाखल झाली आहे.

Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या मर्सिडिजला नेमकं काय झालं होतं? हाँगकाँगची टीम ठाण्यात!
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आता कार तपासणीसाठी हाँगकाँगमधील तज्ज्ञांची टीम ठाण्यामध्ये दाखल झाली आहे.
| Updated on: Sep 13, 2022 | 5:46 PM
Share

ठाणे : उद्योजक (Cyras Mistri) सायरस मिस्त्री यांचा 4 सप्टेंबर रोजी कार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ते अहमदाबादहून मुंबईकडे निघाले असताना पालघर-चारोटी परिसरातील सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला होता. नेमका अपघात घडला कसा आणि (Mercedes Car) मर्सिडिज कार असातानाही ही दुर्घटना झाली कशी याचा शोध अद्यापही सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अपघाताच्या 5 सेकंदपूर्वी कारचा वेग काय होता आणि किती वेग असताना ब्रेक लावण्यात आले. याचा अहवाल सादर करण्यात आला होता. आता ती मर्सिडिज कार (Thane) ठाणे येथील शोरुममध्ये आणण्यात आली आहे. तर गाडीच्या तपासासाठी थेट हाँगकाँगमधील तज्ज्ञांची टीम दाखल झाली आहे.

मरर्सिडिज कंपनीच्या अहवालात काय?

मर्सिडिज कंपनीने यापूर्वीही एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये कारचा वेग हा ताशी 100 किमी असा होता. तर अपघाताच्या 5 सेकंद आधी चालकाने ब्रेकही लावला होता. त्यामुळे गाडीचा वेग हा 89 किमी प्रतितासावरून थेट 11 किमी प्रतितास इतक्यावर आला होता. या अवस्थेतच अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

हाँगकाँगमधील तज्ज्ञांची टीम ठाण्यामध्ये

अपघातामधील मर्सिडिज कार ही आता ठाण्यातील शोरुममध्ये आणण्यात आली आहे. शिवाय मर्सिडिज कंपनीने प्राथमिक अहवाल दिल्यानंतरच हाँगकाँगमधील तज्ज्ञांची टीम तपासासाठी 12 सप्टेंबर रोजी येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी ही टीम ठाणे येथे दाखल झाली आहे. त्यांच्याकडून गाडीची संपूर्ण तपासणी होणार आहे. त्यामुळे आणखी काही बाबी समोर येऊ शकणार आहेत.

एअर बॅगची काय होती अवस्था?

गाडीमधील एअर बॅगमुळे का होईना मिस्त्री यांचे प्राण वाचायला पाहिजे होते, असे म्हटले जात आहे. आरटीओने अपघाता दरम्यान एअरबॅगची काय अवस्था होती, हे देखील अहवालात नमूद केले आहे. अपघात झाला तेव्हा गाडीतील चारही एअरबॅग ह्या उघडण्यात आल्या होत्या. यामधील तीन एअर बॅग ह्या चालकासमोरील होत्या तर एक चालकाच्या बाजूच्या सीटवरील उघडली गेली होती.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.