मोदींसह भाजपचे ‘हे’ चार दिग्गज नेते कुठून लढणार?

मोदींसह भाजपचे 'हे' चार दिग्गज नेते कुठून लढणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा समावेश आहे. याच पहिल्या यादीत भाजपने महाराष्ट्रातील 16 उमेदवारांचीही घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी – नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असून, भाजपमधील अत्यंत ताकदवान नेते आहेत. गेल्यावेळी नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेश (वाराणसी) आणि गुजरातमधून (बडोदा) लढले होते. यावेळीही पहिल्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव असून, ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून रिंगणात उतरले आहेत. मोदी यंदाही दोन जागांवरुन लढतील का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, वाराणसीतून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

वाचा : Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर

अमित शाह – अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षातील सर्वोच्च नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय, सद्यस्थितीत भाजपमध्ये सर्वात अधिकारी आणि ताकदवान नेता म्हणूनही अमित शाह यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगरमधून लढणार आहेत. या जागेवरुन गेल्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लढले होते.

राजनाथ सिंह – राजनाथ सिंह हे केंद्रीय गृहमंत्री असून, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. भाजपच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या स्थानावरील मंत्री आणि भाजपमधीलही अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून राजनाथ सिंह लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

नितीन गडकरी – नितीन गडकरी हे महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावरील भाजपचे मोठे नेते आहेत. सध्या ते केंद्रीय मंत्रिमंडळात परिवहन मंत्रालयाचे मंत्री असून, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्षही ते राहिले आहेत. नितीन गडकरी हे त्यांच्या परंपरागत नागपूर या लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत.

संबंधित बातम्या :

भाजपच्या पहिल्या यादीतल्या 16 जणांविरुद्ध आघाडीचे ‘हे’ उमेदवार

भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

Published On - 10:05 pm, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI