‘यांना काय कळतं शेतीतलं?’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा राऊतांना डिवचलं, महाविकास आघाडी सरकारला सुनावलं

'यांना काय कळतं शेतीतलं?', चंद्रकांत पाटलांनी पुन्हा राऊतांना डिवचलं, महाविकास आघाडी सरकारला सुनावलं
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : बहुमत नसलेल्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय असल्याचंही चंद्रकात पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

भूषण पाटील

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 28, 2022 | 12:45 PM

कोल्हापूर : बारा आमदारांचं निलबंन रद्द झाल्याच्या (Maharashtra 12 BJP MLA Suspension) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच सुप्रीम कोर्टाचे आभारदेखील मानले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारवरही सडेतोड शब्दांत टीका केली आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं पुस्तक काढण्यासाठी एकाला कामाला लावलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं केलेली कृती ही घटनाबाह्य कृती आहे, असं कोर्टानं (Supreme Court on suspension of 12 BJP MLA) म्हटल्याचंही त्यांनी नमूद केलंय. इतकंच काय निलंबन रद्द केलं नाही, तर लोकशाहीला धोका निर्माण होईल, असं देखील कोर्टानं म्हटलं असल्याचं पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. बहुमत नसलेल्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय असल्याचंही चंद्रकात पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी परीक्षांचे घोटाळे, शेतकऱ्यांची उपेक्षा, आणि आता वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुनही फटकारलंय.

त्यांना काय कळतंय शेतीतलं?

वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरा सुनावलं आहे. यांना काय कळतंय शेतीतलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या पोराला तुम्हाला दारुच्या नादाला लावायचंय का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती मदत केली? कर्जमाफी तर केली नाही.. यांना शेतीतलं काय कळतंय, असा म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. संजय राऊत यांनाही पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी डिवचलंय. 12 आमदारांच्या राज्यपाल नियुक्तीचा आणि या निर्णयाचा काहीही संबंध नाही. संजय राऊत तुम्ही शपथ देत नाही मुख्यमंत्री आणि आमदारांना.. राज्यपाल हे सर्वोच्च पद घटनात्मकदृष्ट्या मोठं पद आहे.. फुले, शाहू आंबेडकरांचं नाव राऊत प्रत्येक वेळी भाषणात घेतात. पण राऊतांच्या ओठात आंबेडकर आहेत, पण पोटात काय? तर बाबासाहेबांची घटना मान्य नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंद

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंद झाला असून महाविकास आघाडी सरकारनं हुकुमशाही करत हा निर्णय घेतला होता, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, तीन पक्षांचं सरकार असणाऱ्या महाविकास आघाडीच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Mla Suspension: महाविकास आघाडीला कोर्टाची सणसणीत चपराक, सत्यमेव जयते!; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

12 आमदारांचं निलबंन रद्द करताना सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? आशीष शेलारांनी सांगितलं!

‘ही तर सरकारला मिळालेली सणसणीत चपराक!’ 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच दरेकरांचा घणाघात


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें