CM Shinde: खातेवाटपानंतर शिंदे गटातील तीन मंत्री नाराज? अखेर भुसे, केसरकर आणि भुमरे आले समोर, म्हणाले..

एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यात शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे आणि बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा होती. या तिन्ही नेत्यांनाही कमी महत्त्वाची खाती पदरात पडल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, अखेरीस या तिन्ही मंत्र्यांनी आज समोर येत स्पष्टीकरण दिले.

CM Shinde: खातेवाटपानंतर शिंदे गटातील तीन मंत्री नाराज? अखेर भुसे, केसरकर आणि भुमरे आले समोर, म्हणाले..
अखेर तीन मंत्री आले समोर.. म्हणाले..
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Aug 15, 2022 | 6:13 PM

मुंबई- एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेरीस रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात भाजपाकडे(BJP) चांगली खाती गेल्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे कमी महत्त्वाची खाती गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटातील तीन मंत्री त्यांना मिळालेल्या खातेवाटपावर नाराज (upset)असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यात शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे आणि बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा होती. या तिन्ही नेत्यांनाही कमी महत्त्वाची खाती पदरात पडल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, अखेरीस या तिन्ही मंत्र्यांनी आज समोर येत, खातेवाटपावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे तिन्ही मंत्री काय म्हणालेत ते ही पाहूयात.

अजिबात नाराजी नाही – दीपक केसरकर

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर नाराज नसल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण खात्यावर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या शिक्षण खात्यात सुधारणा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्यात धोरणे सातत्याने बदलू शकत नाहीत, त्यामुळे माजी शिक्षणमंत्री आणि इतरांशी चर्चा करुन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात मिळालेल्या खात्याबाबत कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच शिंदे गटाला पर्यटन सोडून आरोग्य हे चांगले खाते मिळाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात मराठवाड्यातील शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

वेगळ्या खात्याची केली होती मागणी – दादा भुसे

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांच्याकडे कृषी खाते होते. मात्र प्रवासामुळे प्रकृतीवर परिणाम होत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्याकडेही वेगळ्या विभागाची मागणी करत होतो, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. जेव्हा आपल्याकडे एखादी जबाबदारी येते त्यावेळी जर आपण त्याला वेळ देऊ शकणार नसल्यास, ते योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी खाते न मिळाल्याने नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खाते कुठले हे महत्त्वाचे नाही – भुमरे

रोहयो खाते हे गरिबाचे आणि शेतकऱ्याचे खाते आहे. या खात्यामार्फत गोरगरिबांची कामे करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या खात्याबाबत समाधानी असल्याचेही भुमरे यांनी सांगितले. खातं कोणतं मिळालं हे महत्त्वाचे नाही, तर खात्यामार्फत काम का करायचं हे महत्त्वाचं आहे, असे त्यांनी सांगितले. एका शिवसैनिकाला दुसऱ्यांना कॅबिनेट खाते मिळआले हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्ष्ट केले आहे.

नाराजीची चर्चा, शिवसेनेची टीका

शिवसेनेने शिंदे गटाला मिळालेल्या खात्यांवरुन टीका केली आहे. भाजपा तुपाशी आणि शिंदे गट उपाशी अशी टीका शिवसेनेने मुखपत्र समानातून केली आहे. तसेच कालपासून झालेल्या विस्तारानंतर शिंदे गटातील मंत्रज्ञी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तर खातेवाटपावर होत असलेल्या नाराजीवर अजित पवारांनीही टीका केली आहे. मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे ते ठरवतील तेच मंत्री असतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

खाते कोणतं त्यापेक्षा न्याय काय देता, हे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

खाते कोणते आहे, त्यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या ज्या मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे, ते यशस्वीपणे जबाबदारी पर पाडतील आणि राज्यातील जनतेला न्याय देतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री झाल्यानंतर तो राज्याचा मंत्री असतो, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वांगिण विकासाचं काम होईल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें