AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना मोठा झटका, अमित शाहांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीच्या 3 मोठ्या नेत्यांचा राजीनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला मोठा झटका बसला आहे.

ममता बॅनर्जींना मोठा झटका, अमित शाहांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीच्या 3 मोठ्या नेत्यांचा राजीनामा
| Updated on: Dec 17, 2020 | 10:15 PM
Share

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला मोठा झटका बसला आहे. टीएमसीच्या 3 मोठ्या नेत्यांनी टीएमसीतून राजीनामा (Resign) दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. अमित शाह 19 आणि 20 डिसेंबर रोजी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असतील. त्यामुळे याआधी आणखी काही टीएमसी नेते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे (TMC 3 Big leader resign from TMC amid Bengal tour of Home Minister Amit Shah).

टीएमसी नेत्यांच्या (TMC Leaders) राजीनामा सत्राने बंगालमधील राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष (BJP Leader) रितेश तिवारी म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते खूपच उत्साही आहेत. मागील 24 तासात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या 3 प्रमुख नेत्यांनी (Three TMC leaders) राजीनामा दिला असून ते लवकरच अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसात अनेक टीएमसी नेत्यांकडून राजीनामे

काही दिवसांपूर्वीच टीएमसीचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या परिवहन मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतंकच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीपासून अगदी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापर्यंतच्या सर्व पदाचा राजीनामा दिलाय. दुसरीकडे निवृत्त कर्नल दीप्तांगशु चौधरी यांनी दक्षिण बंगाल राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. आमदार जितेंद्र तिवारी यांनी देखील आसनसोल नगरपालिकेच्या मंडळाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.

नोव्हेंबर महिन्यात कूचबिहार दक्षिण मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेस आमदार मिहिर गोस्वामी यांनी टीएमसीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय.

हेही वाचा :

आम्हाला RSS चं हिंदुत्व मान्य नाही, भाजपविरुद्ध दोन हात करण्यास तयार, ममता कडाडल्या

बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध ‘बाहरी’? काय काय घडतंय?

जे. पी. नड्डांवरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय अलर्ट, कैलाश विजयवर्गीय यांना बुलेटप्रूफ कार

TMC 3 Big leader resign from TMC amid Bengal tour of Home Minister Amit Shah

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.