दिल्लीत भाजपच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे एनडीए सरकारच्या बाजूने आल्यानंतर नवी दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे परदेशात असल्याने त्यांच्या बैठकीत उपस्थित राहणार का? यावर शंका […]

दिल्लीत भाजपच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 3:19 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे एनडीए सरकारच्या बाजूने आल्यानंतर नवी दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे परदेशात असल्याने त्यांच्या बैठकीत उपस्थित राहणार का? यावर शंका व्यक्त करण्यात येत होती.

देशात लोकसभा निवडणुकीतील सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर रविवारी (19 मे) ला सर्व महत्त्वाच्या वाहिन्यांचे आणि एजन्सीचे पोल जाहीर झाले. या पोलमध्ये अनेकांनी पुन्हा मोदीचं सत्तेत येणार असल्याचे म्हटलं होतं. एक्झिट पोलचे आकडे शिवसेना-भाजप सरकारच्या बाजूने आल्यानंतर दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात आज (21 मे) संध्याकाळी 7 वाजता बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये विशेष डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या बैठकीत भाजप, शिवसेना, जेडीयू, अण्णा द्रमुक, एआईएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यांसह एनडीएतील इतर 40 घटक पक्षातील नेते सहभागी होणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेशात फिरायला गेले होते. त्यामुळे ते या बैठकीला अनुपस्थितीत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांच्या अनुपस्थितीत शिवसेना नेते सुभाष देसाई किंवा अनंत गीते भाजपच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आज (21 मे) दुपारच्या सुमारास ते मुंबईत परतले आहेत. त्यामुळे दिल्लीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विशेष बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.