Maharashtra Political News live : अहमदनगरमध्ये एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांना धमकी

| Updated on: Apr 30, 2024 | 7:12 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : अहमदनगरमध्ये एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांना धमकी

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Apr 2024 07:11 PM (IST)

    एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांना धमकी

    अहमदनगर : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांना धमकी देण्यात आली आहे. अशरफी यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर माघरीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांना त्याच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी धमकी दिली. धमकी प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 507 प्रमाणे दाखल करण्यात आलाय.

  • 30 Apr 2024 03:00 PM (IST)

    जनतेला अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग

    जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप शरद पवार यांनी केला. – मुळात सत्ता ही जनहिताच्या कामासाठी करायची असते, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडलं आहे, असे ते म्हणाले.

  • 30 Apr 2024 02:57 PM (IST)

    डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग

    डोंबिवलीतील उध्दव ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पदाधिकारी मुंबईला रवाना झाल्याची माहिती दिली आहे.  डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर , कविता गावंड या नावांची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून नाराजी होती.

  • 30 Apr 2024 02:50 PM (IST)

    मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. काल तोफ डागल्यानंतर आज माढ्यात त्यांनी पुन्हा पवारांना लक्ष्य केले. त्यांनी कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल विचारला.

  • 30 Apr 2024 02:45 PM (IST)

    गिरीश महाजन-शांतिगिरी महाराज यांच्यातील चर्चा निष्कळ

    गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यातील चर्चा निष्कळ ठरली आहे. निवडणूक लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढणार आहेत.  भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचे मत आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहावं अशी महाराजांना विनंती केली.  येत्या दोन दिवसात महायुतीच्या उमेदवाराचा तिला सुटेल असा दावा महाजन यांनी केला आहे.

  • 30 Apr 2024 02:40 PM (IST)

    नगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा

    अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. शहरातील सावेडी भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी 6 मे रोजी शहरात असतील.

  • 30 Apr 2024 02:30 PM (IST)

    मनोज जरांगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

    मराठा गनिमी काव्याने काम करत आहे. मोदींना महाराष्ट्रात लोकसभेसाठी प्रचार करण्यासाठी यावे लागत आहे हा मराठ्याचा विजय आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना प्रचारासाठी उतरवले आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

  • 30 Apr 2024 02:30 PM (IST)

    मनोज जरांगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

    कोल्हापूरच्या इचलकरंजीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली. मराठा गनिमी काव्याने सध्या काम करत आहेत. मोदींना महाराष्ट्रात लोकसभेसाठी प्रचार करण्यासाठी यावे लागत आहे. हा मराठ्याचा विजय आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना प्रचारासाठी उतरवला आहे. छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी पेक्षा मोठा आहे का? त्यांनी आमच्यावर बोलताना भांड ठेवून बोलावं. लोकसभेला मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. मराठ्यांनी ज्याला मतदान करायचे करावं. ज्याला पडायचं त्याला पाडावं, असं जरांगे म्हणाले.

  • 30 Apr 2024 02:20 PM (IST)

    चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा भाजपचा विचार

    भाजपच्या मनात पुन्हा एकादा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा विचार असल्याचा खबळबळजनक दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. धुळे येथे त्यांनी हे विधान केले. त्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

  • 30 Apr 2024 02:15 PM (IST)

    नाशिकच्या राजकारणातली मोठी बातमी

    गिरीश महाजन हे शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात पोहोचले आहेत. गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यात बंद दारा आड चर्चा झाली. महाराजांनी माघार घेण्यासाठी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. हिंदू मतं विभागली जाऊ नये यासाठी शांतिगिरी महाराजांना थांबवण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या उमेदवारीचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे.

  • 30 Apr 2024 02:10 PM (IST)

    राज ठाकरे यांची कणकवलीत सभा

    नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सिंधुदुर्गात येत आहे. कणकवली येथे ४ तारखेला सायंकाळी पाच वाजता राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची ३ तारखेला कणकवलीत सभा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या सभेचे नियोजन करण्यात आले.

  • 30 Apr 2024 02:00 PM (IST)

    आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान

    छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. जवळपास दीड महिन्यात पोलिसांची तिसरी यशस्वी कामगिरी आहे. नारायणपुर व कांकेर जिल्ह्यातील मध्यभाग असलेला टेकमेटा जंगल परिसरात आज १२ वाजेपर्यंत चकमक सुरु होती. छतीसगडातील "डी आर जी व एसटीएफ पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात अभियान राबविले. घटनास्थळावरून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली.

  • 30 Apr 2024 12:57 PM (IST)

    जळगाव महापालिकेचे ३० पेक्षा जास्त नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात..

    भाजपच्या नगरसेवकांसोबत शिवसेना ठाकरे गटाच्या गुप्त बैठका सुरू. भाजपच्या नगरसेवकांचा लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार ..

  • 30 Apr 2024 12:36 PM (IST)

    भारती पवार छगन भुजबळ यांच्या भेटीला

    भारती पवार यांनी भुजबळ फॉर्मवर घेतली छगन भुजबळ यांची भेट. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार. निवडणुकांच्या अनुषंगाने दोघांमध्ये बैठक

  • 30 Apr 2024 12:21 PM (IST)

    अमोल कोल्हे यांची अजित पवार यांच्यावर जोरदार टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात वापरलेल्या भाषेचा मी निषेध करतो. शरद पवारांमुळं राज्य अस्थिर होतं, हा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का? मूग गिळून त्यांनी हे सिद्ध केलं, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेनी अजित पवारांना घेरलं.

  • 30 Apr 2024 12:05 PM (IST)

    मोठ्या शक्ती प्रदर्शन करत शोभा बच्छाव अर्ज भरणार

    धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव उमेदवारी अर्ज भरणार. थोड्याच वेळात भव्य रॅलीचे आयोजन. मोठ्या शक्ती प्रदर्शन करत शोभा बच्छाव अर्ज भरणार..

  • 30 Apr 2024 11:50 AM (IST)

    खडसे कुटुंबीयांबाबत 137 कोटी रुपयांच्या अवैध उत्खनन प्रकरणी आज सुनावणी

    खडसे कुटुंबीयांबाबत 137 कोटी रुपयांच्या अवैध उत्खनन प्रकरणाची आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नेमकं या प्रकरणावर काय सुनावणी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे

  • 30 Apr 2024 11:40 AM (IST)

    माढा मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकर पुन्हा निवडून येणार- फडणवीस

    माढा मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकर पुन्हा निवडून येणार. त्यांनी दिलेले सर्व शब्द पूर्ण केले आहेत. रणजीतदादांमुळे माढ्यात रेल्वे आली, पाणी आलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 30 Apr 2024 11:30 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर

    बेळगाव- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खानापूर मध्ये जाहीर सभा होणार आहे. कारभार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. मलप्रभा मैदानावर संध्याकाळी चार वाजता ही सभा होणार आहे.

  • 30 Apr 2024 11:20 AM (IST)

    नांदेड-भोकर महामार्गावर दुसरा अपघात

    नांदेड-भोकर महामार्गावर दुसरा अपघात झाला असून अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नांदेड इथं रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. नांदेड-भोकर मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सकाळी आठ वाजता झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर आठ दुचाकींचं नुकसान झालं होतं.

  • 30 Apr 2024 11:10 AM (IST)

    2 मे रोजी नाशिक महायुतीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

    नाशिक- 2 मे रोजी नाशिक महायुतीचे उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिंडोरी भाजपाचे उमेदवार भारती पवार आणि नाशिकचा उमेदवार एकत्रिक अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकत्रिक अर्ज भरण्यात येणार असल्याने उद्याच महायुतीला नाशिकचे उमेदवार जाहीर करावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 30 Apr 2024 10:57 AM (IST)

    Live Update | मुंबई -आग्रा महामार्गांवर एसटी-ट्रकचा भीषण अपघात..

    मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवडच्या राहूड जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघात.. . अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.. इतर प्रवासी गंभीर जखमी.. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे दाखल... अपघातामुळे वाहतूक ठप्प...

  • 30 Apr 2024 10:45 AM (IST)

    Live Update | शिवसेना शिंदे गटाकडून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे - शांतिगिरी महाराज

    शिवसेना शिंदे गटाकडून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे... देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आमची चर्चा सुरू... महायुतीने आम्हाला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित... आमची चर्चा थेट वरिष्ठ नेत्यांशी सुरू... सहा ते सात जिल्ह्यांमध्ये आम्ही मोदींच काम केलं आहे... त्या बदल्यात आमच्या नावाचा विचार व्हावा अशी अपेक्षा... कोणत्याही परिस्थितीत निवडणूक तर लढणारच.. असं वक्तव्य शांतिगिरी महाराज यांनी केलं आहे.

  • 30 Apr 2024 10:30 AM (IST)

    Live Update | जळगावच्या शिरसोलीमध्ये बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचां दोन तास रास्ता रोको

    जळगावच्या शिरसोलीमध्ये बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचां दोन तास रास्ता रोको... विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत या मार्गावरील बस रोखून धरल्या, वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा... वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक

  • 30 Apr 2024 10:13 AM (IST)

    Live Update | नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय - संजय राऊत

    नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय... गुजरातच्या आत्म्याकडून चुकीची विधानं... भाजपनं बाबासाहेबांचं उल्लेख तरी केला का? भाजपला बाबासाहेबांचं संविधान बदलायचं आहे... आम्ही लोकांवर पंतप्रधान लादणार नाही... भटकता आत्मा पंतप्रधानपदावर बसला तर भुताटकी येईल... असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 30 Apr 2024 09:57 AM (IST)

    जळगावच्या शिरसोलीमध्ये बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा दोन तास रास्ता रोको

    जळगावच्या शिरसोली मध्ये बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दोन तास रास्ता रोको केला.  विद्यार्थ्यानी रास्ता रोको करत या मार्गावरील बस रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.  वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले.

  • 30 Apr 2024 09:48 AM (IST)

    रत्नागिरी - मतदारांसाठी वेटिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध

    कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढतोय आणि त्याचा परिणा मतदानावर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली आहे. उष्णतेच्या लाटेचा विचार करू रत्नागिरीमध्ये मतदारांसाठी वेटिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • 30 Apr 2024 09:32 AM (IST)

    माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा

    माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.  महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर आहेत. हायव्होल्टेज लढतीसाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत.

    काही दिवसापूर्वी भाजपच्या गडाला शरद पवारांनी सुरुंग लावलं होता. धैर्यशील मोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात घेऊन थेट उमेदवारी दिली.

  • 30 Apr 2024 09:12 AM (IST)

    नांदेडमध्ये सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची 8 दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू

    नांदेडमध्ये सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची 8 दुचाकींना धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • 30 Apr 2024 09:05 AM (IST)

    तानाजी सावंत यांचा पोस्टमधून ओमराजे निंबाळकरांवर निशाणा

    मंत्री तानाजी सावंत यांनी पोस्टमधून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधला आहे. पैसे खाऊन नका, असा खोचक सल्ला तानाजी सावंत यांनी दिला आहे.

  • 30 Apr 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News : लहरी हवामानाचा रानमेव्याला फटका

    सध्याच्या लहरी हवामानामुळे नैसर्गिक रानमेवा उत्पादनावर मोठा परिणाम. हापूस आंबा स्वस्त. उन्हाळा म्हटलं की, रानमेवा चाखण्याची आस लागलेली असते. मात्र यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी नागरिकांना रानमेव्याची प्रतीक्षा आहे. डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असणारी करवंद, रसदार जाबळे, आंबट गोड चिंचा, कैऱ्या अशा प्रकारचा रानमेवा या काळात मिळतो. मात्र यंदाच्या लहरी हवामानामुळे या सर्व रानमेव्याला फटका बसला आहे

  • 30 Apr 2024 08:22 AM (IST)

    Maharashtra News : नाशिकमध्ये विजय करंजकर बंडखोरी करणार का?

    नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत. उमेदवारी अर्ज घेतल्याने बंडखोरीच्या चर्चांना उधाण. ठाकरे गटाकडून उमेदवारी कापली गेल्याने करंजकर नाराज. उद्धव ठाकरेंनी बोलवूनही करंजकरांनी भेट न घेतल्याने नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता. विजय करंजकर यांच्यासाठी त्यांच्या भावाने घेतला अर्ज.

  • 30 Apr 2024 08:19 AM (IST)

    Maharashtra News : बारा ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिरात चार दिवस अभिषेक पूजा बंद राहणार

    श्री क्षेत्र भीमाशंकर येथे 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान महारुद्र अनुष्ठान संतत जलधारा हा रुद्राभिषेक उत्सव चालू झाल्याने या उत्सव काळात भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार आहे. भाविकांना फक्त दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री भीमाशंकर रुद्र स्वाहाकार समिती अध्यक्ष मधुकर गवांदे यांनी दिली.

  • 30 Apr 2024 08:18 AM (IST)

    Maharashtra News : मध्यरात्री नागपुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

    मध्यरात्री नागपुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. सकाळी पाऊस पूर्णतः थांबला, मात्र ढगाळ वातावरण. उकाड्याने नागपूरकर हैराण. काल दिवसभर नागपुरात वाढला होता उकाडा. आता तापमानात वाढ होण्याचा नागपूर हवामान विभागाचा अंदाज.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान महारुद्र अनुष्ठान संतत जलधारा हा रुद्राभिषेक उत्सव चालू झाल्याने .या उत्सव काळात भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार आहे. भाविकांना फक्त दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री भीमाशंकर रुद्र स्वाहाकार समिती अध्यक्ष मधुकर गवांदे यांनी दिली. दिलीप वळसे पाटील यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. घरात पडून दुखापत झाल्याने वळसे पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना मंचर येथील घरी आणण्यात आले आहे. यावेळी त्याच्या समर्थकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. 27 मार्चला पुण्यातील घरात पाय घसरल्याने झाली होती दुखापत. लोकसभा निवडणूक प्रचारात दिलीप वळसे पुन्हा सक्रिय होणार. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Apr 30,2024 8:17 AM

Follow us
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.