AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची धुरा? पडद्यामागच्या घडामोडींना वेग

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर असलेल्या गंभीरकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे खरंच अशी ऑफर दिली गेली असेल तर गौतम गंभीर स्वीकारणार की नाकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची धुरा? पडद्यामागच्या घडामोडींना वेग
| Updated on: May 17, 2024 | 10:26 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले असताना बीसीसीआयने आतापासून हेड कोच पदासाठी अर्ज मागवले आहेत. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी बीसीसीआयने आतापासूनच शोधाशोध सुरु केली आहे. कारण टी20 वर्ल्डकपमध्ये काहीही निकाल लागला तरी प्रशिक्षकपदाची जागा भरणं गरजेचं आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडने आपला कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ती जागी काहीही करून भरावी लागणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून अनेक नावं चर्चेत आली आहेत. विदेशी कोचच्या शर्यतीत फ्लेमिंग आणि लँगर यांची नाव आघाडीवर आहेत. आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीवीर गौतम गंभीर याचं नाव चर्चेत आलं आहे. बीसीसीआयच्या आवडीच्या उमेदवारापैकी हे एक नाव आहे. गौतम गंभीर सध्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटॉरची भूमिका बजावत आहे. कोलकात्याने यावर्षी चांगली कामगिरी केली असून गुणतालिकेत टॉपला आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरशी संपर्क साधला होता. आता पुढची बोलणी आयपीएलचं पर्व संपल्यानंतर केली जातील. गंभीरने ही विनंती मान्य केली तर त्याला केकेआर संघ सोडावा लागेल. कारण बीसीसीआयच्या कराराखाली असलेले इतर लीगमध्ये काम करू शकत नाहीत. दुसरीकडे, बीसीसीआयने हेड पोस्टसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. त्यात अर्जदारांना 27 मे पर्यंत आपला अर्ज दाखल करायचा आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडने आपला कार्यकाळ वाढवणार नसल्याचं बीसीसीआयला आधीच सांगितलं आहे.एनसीएचे विद्यमान अध्यक्ष असलेले व्हीव्हीएस लक्ष्मणही या पदासाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे.

गौतम गंभीर 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्याने 122 चेंडूत 97 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. तसेच त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2012 आणि 2014 जिंकले होते. पण भरघोस यश मिळवणाऱ्या गौतम गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्तरावर प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही. आयपीएल फ्रँचायझीच्या कोचिंग स्टाफचा प्रभारी होता. आता त्याचा टीम इंडियाला किती फायदा होईल आणि तो ही ऑफर स्वीकारतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Follow Us
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य