‘भाजपची पोलखोल करणार’, सचिन सावंतांचा इशारा, ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची लक्तरं वेशीवर टांगली, दरेकरांचं प्रत्युत्तर

गुरुवारी आपण भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा सावंतांनी दिला आहे. त्यावरही दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

'भाजपची पोलखोल करणार', सचिन सावंतांचा इशारा, 'पोलखोल' च्या नादात स्वपक्षाची लक्तरं वेशीवर टांगली, दरेकरांचं प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:58 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये दिवसेंदिवस राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जोरदार ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे. संभाजीराजेंना न भेटणारे मोदी कंगना आणि प्रियंकाला कोणत्या प्रश्नावर चर्चेसाठी भेटले असा सवाल सावंत यांनी विचारला होता. त्यावर मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान आम्हाला भाजपला शिकवू नका असं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलं होतं. आता गुरुवारी आपण भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा सावंतांनी दिला आहे. त्यावरही दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. (Twitter war between Sachin Sawant and Praveen Darekar over Maratha reservation)

“कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रवीण दरेकर व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपा ची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू”, असं ट्वीट करुन सचिन सावंत यांनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिलाय.

‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची लक्तरं वेशीवर टांगत आहात

सचिन सावंतांनी दिलेल्या इशाराऱ्या प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युतर दिलं आहे. ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात! बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या”, असा टोला दरेकर यांनी सावंतांना लगावलाय.

‘तुमचा बुरखा आम्ही टराटरा फाडू’

त्याचबरोबर ‘राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!’, असं जोरदार प्रत्युत्तर दरेकर यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

“मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, सामनातील बातमीवरुन अतुल भातखळकरांचा राऊतांना टोला

म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी, फडणवीसांचा गंभीर आरोप

Twitter war between Sachin Sawant and Praveen Darekar over Maratha reservation

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.