मुख्यमंत्री कमलनाथांकडून जशास तसं उत्तर, भाजपचे दोन आमदार फोडले?

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 24, 2019 | 7:42 PM

भाजपच्या दोन (Two BJP MLA's) आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन कमलनाथ (CM Kamal Nath) सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा दिला. शिवाय या आमदारांना (Two BJP MLA's) काँग्रेसने आता अज्ञातस्थळी ठेवलंय. दोन्ही आमदार कमलनाथ यांच्यासोबत डिनर करणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री कमलनाथांकडून जशास तसं उत्तर, भाजपचे दोन आमदार फोडले?

भोपाळ : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार पडल्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारही संकटात असल्याचा संकेत भाजपकडून देण्यात आले. पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamal Nath) यांनी त्याअगोदरच भाजपला दणका दिलाय. भाजपच्या दोन (Two BJP MLA’s) आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन कमलनाथ (CM Kamal Nath) सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा दिला. शिवाय या आमदारांना (Two BJP MLA’s) काँग्रेसने आता अज्ञातस्थळी ठेवलंय. दोन्ही आमदार कमलनाथ यांच्यासोबत डिनर करणार असल्याची माहिती आहे.

शरद कौल आणि नारायण त्रिपाठी यांनी गुन्हेगारी संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. कौल शहडोल जिल्ह्यातील ब्योहारीचे आणि त्रिपाठी सतना जिल्ह्यातील मेहरचे आमदार आहेत. आमचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. पण विधानसभेत भाजपच्याच दोन आमदारांनी आमच्या बाजूने मतदान केलंय, असा टोलाही कमलनाथ यांनी भाजपला लगावला.

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. वरुन (दिल्लीतून) क्रमांक एक किंवा क्रमांक दोनचा आदेश आला तर एक दिवसही सरकार चालू देणार नाही, असंही भार्गव म्हणाले होते.

दरम्यान, कमलनाथांनीही याला तातडीने उत्तर दिलं. विरोधी पक्षाला वाटेल तेव्हा त्यांनी विश्वासदर्शक ठराव आणावा, आम्ही बहुमत सिद्ध करु, असं आव्हान कमलनाथ यांनी दिलं. आमचे आमदार विकले जाणार नाहीत, पाच वर्षांचा कार्यकाळ आम्ही पूर्ण करु आणि विकासाचा नवा नकाशा तयार करु, असंही ते म्हणाले.

कमलनाथ उत्तर देत असतानाच भार्गव यांनीही प्रत्युत्तर दिलं. आम्हाला आमदारांची खरेदी करण्यावर विश्वास नाही. पण वरुन एक किंवा दोन नंबरचा आदेश आला तर एक दिवसही सरकार चालणार नाही, असं ते म्हणाले. यानंतर काँग्रेस आमदारांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप करत गदारोळ घातला.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. पण काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 230 सदस्यीय मध्य प्रदेश विधानसभेत बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. पण काँग्रेसकडे 114 आमदार होते. काँग्रेसने बसपाचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. कमलनाथ यांच्याकडे सध्या 121 आमदारांचा पाठिंबा आहे, तर भाजपकडे 108 आमदार आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI