..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक

रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला.  माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक

मुंबई : साताऱ्यातील रामराजे निंबाळकर विरुद्ध उदयनराजे भोसले हा वाद आता मुंबईत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीतून खासदार उदयनराजे भोसले बाहेर आले. चर्चेतून काढता पाय घेतल्यानंतर उदयनराजेंनी रामराजेंबद्दल आक्रमक पवित्रा घेतला.

रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला.  माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

कुणाचंही ऐकून घ्यायला मी लेच्यापेच्या नाही. मी उदयनराजे आहे. महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागतं. मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय झाला की मी चक्रम होतो, असं उदयनराजे म्हणाले.

पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलं तर मला रेबीज होईल, असा टोमणा राजेंनी निंबाळकरांना लगावला.  रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंसह भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली होती. त्याला राजेंनी आज उत्तर दिलं.

शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत. मी सहन करणार नाही, असं उदयनराजे म्हणाले.

रामराजे निंबाळकर काय म्हणाले?

“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली.

जयकुमार गोरे यांचं रामराजेंना उत्तर

काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. “आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्या सभापतीपदाला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही”, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली.

संबंधित बातम्या 

िसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना  

लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!  

“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह

Published On - 3:05 pm, Sat, 15 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI