AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट, कोणाला कोणतं चिन्ह मिळणार? शिवसेनेच्या चिन्हाबाबत महत्वाची अपडेट

ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाचीही 3 चिन्हांचे पर्याय दिले आहेत.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट, कोणाला कोणतं चिन्ह मिळणार? शिवसेनेच्या चिन्हाबाबत महत्वाची अपडेट
Image Credit source: tv9 marathi
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 10, 2022 | 4:23 PM
Share

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. दोन्ही गटांकडून चिन्हाच्या पर्यायाबाबात चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाचीही 3 चिन्हांचे पर्याय दिले आहेत.

ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला गदा चिन्ह मिळणार असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाने दिलेल्या दोन चिन्हांची पर्यायं सारखी आहेत.

त्रिशूळ आणि उगवता सूर्य चिन्हांचा पर्याय सारखा आहे. यामुळे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याचं चिन्ह निवडणूक आयोग वगळण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत 3 पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत. त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे.

यानंतर रविवारी रात्री उशीरा शिंदे गटाने गदा, तलवार आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली. मात्र, सोमवारी सकाळी ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला.

यामुळे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याचं चिन्ह हे दोन पर्याय समान झाले आहेत. यामुळे उर्वरीत राहिलेल्या चिन्हांचा पर्याय निवडावा लागणार आहे. यामुळेच ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला गदा चिन्ह मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान