CM Uddhav Thackeray : मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारेच पळून गेले, उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच ‘त्या’ आमदारांचा उल्लेख बंडखोर

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटन वाढवण्याच्या सूचना केल्या.

CM Uddhav Thackeray : मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारेच पळून गेले, उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच 'त्या' आमदारांचा उल्लेख बंडखोर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:47 PM

मुंबईः मेलो तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही, असं म्हणणारेच पळून गेले.. या शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची मनातील अस्वस्थता बोलून दाखवली. विशेष म्हणजे आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंड पुकारलेले आमदार परत येतील, ही आशा Uddhav Thackeray called the MLAs rebels who went with Eknath Shinde for the first time in the meeting with district heads(Chief Minister) होती. त्यामुळे या आधी त्यांनी केलेल्या भाषणात आमदारांनी धोका दिलाय, अशा आशयाचे शब्द उद्धव ठाकरेंनी वापरले नव्हते. मात्र आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख बंडखोर असा केलाय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे. माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं.संजय राठोडांवर अनेक आरोप झाले, त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं.. बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना, ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असं जे म्हणायचे, तेच आज पळून गेले, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा’

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी आज आव्हान दिलं. तुम्हाला जायचंय तर खुशाल जा.. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, असं ते म्हणाले. माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही… असंही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्या शिवसैनिकांच शक्तीप्रदर्शन

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटन वाढवण्याच्या सूचना केल्या. तसेच काही बंडखोर फुटून गेले तरी ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे, ते खरे शिवसैनिक आहेत. आपला संघर्ष असाच सुरु ठेवू, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. तर उद्या शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये मातोश्री परिसरात शिवसैनिकांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या मेळाव्याला आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिलाच जाहीर मेळावा आहे. या ठिकाणी शिवसैनिकांचं मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.