आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा, हा तर खोकासूर आणि धोकासूर; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं

ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता.

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा, हा तर खोकासूर आणि धोकासूर; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 05, 2022 | 8:32 PM

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) आज शिवाजी पार्क येथे पार पडतोय. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात तुफान फटकेबाजी केली. आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा आहे, हा तर खोकासूर आणि धोकासूर आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (Uddhav Thackarey criticized on Shinde Group) केली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटातील वादानंतर उद्धव ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

आता शिवसेनेचं काय होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. माझ्या मनात चिंता नव्हती. आज शिवतीर्थावरील गर्दी पाहून अरे बापरे गद्दारांचं कसं होणार असा प्रश्न त्यांना पडला असेल. ही गर्दी भाड्याने आणलेली नाही.

तासाचाी बोली लावून आणलं नाही. यापैकी कुणालाही विचारा. बुजुर्ग आहेत, दिव्यांग आहेत, गावाहून पायी चालत आले आहेत. त्यांनाही विचारा. तिथे एक एक एकटाच आहे. इकडे एकनिष्ठ आहेत. जे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले हे एकनिष्ठ आहेत.

उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाचा समाचार

ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला. डोक्यांचा नाही खोक्यांचा. पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.