40 दिवस उलटून गेले, ठाकरेंची खुर्ची शाबूत; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी हवेत विरली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार लवकरच जाणार असं भाजपकडून सांगितलं जात आहे. (uddhav thackeray government will collapse, acharya tushar bhosale predictions failed)

40 दिवस उलटून गेले, ठाकरेंची खुर्ची शाबूत; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी हवेत विरली?
CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 5:32 PM

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार लवकरच जाणार असं भाजपकडून सांगितलं जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अगदी सत्तांतराची डेडलाईनही दिली. एवढेच काय आचार्य तुषार भोसले यांनी तर 40 दिवसात उद्धव ठाकरे पायउतार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. मात्र, 45 दिवस उलटूनही उद्धव ठाकरे यांची खुर्ची शाबूत असल्याने तुषार भोसले यांची भविष्यवाणी हवेत विरल्याचं उघड झालं आहे. (uddhav thackeray government will collapse, acharya tushar bhosale predictions failed)

आचार्य तुषार भोसले यांनी 7 एप्रिल रोजी नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली होती. अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा भोसले यांनी केला होता.

ठाकरे सरकार मजबूत

भोसले यांनी ठाकरे सरकारची उलटी गणती सुरू झाली असल्याचं म्हटलं असलं तरी ठाकरे सरकार दिवसे न् दिवस अधिक मजबूत होत असल्याचं दिसून येत आहे. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा चांगला सुसंवाद असल्याचंही दिसून येत आहे. शिवाय कोरोना संकटाचा हे तिन्ही पक्ष एकदिलाने मुकाबला करताना दिसत आहेत. तसेच भाजप विरोधात या तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता दिसून येत असून संधी मिळताच तिन्ही पक्षाचे नेते भाजपवर तुटून पडताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांवर भाजपने टीका केल्यास त्या टीकेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सर्वात आधी समाचार घेताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार मजबूत असल्याचं अधोरेखित होत आहे. परिणामी भाजप नेते आणि भाजपच्या अध्यात्मिक आघाड्यांकडून ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत करण्यात येत असलेल्या भविष्यवाण्या हवेत विरताना दिसत आहेत.

सरकार कसं पडणार?

तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 40 दिवसात सत्ता सोडावी लागणार असल्याचं म्हटलं होतं. पण का? आणि कशी? याचं उत्तर भोसले यांनी दिलं नव्हतं. मुख्यमंत्री राजीनामा कसा देतील, त्यासाठी काय कारण घडेल, राजीनाम्या मागची गणितं काय? यावर त्यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं. केवळ डेडलाईन देऊन ते मोकळे झाले होते. या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या बड्या नेत्यांनीही आघाडी सरकार कोसळण्याचं भाकित वर्तवलं होतं. राणेंनी तर महिनाही सांगितला होता. तर काही नेत्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर निश्चित असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. मात्र, डेडलाईन आल्या आणि गेल्या, पश्चिम बंगालच्या निवडणुकाही आल्या आणि गेल्या, पण ठाकरे सरकारवर या भविष्यवाण्यांचा काहीच परिणाम झाला नाही. भाजपच्या नेत्यांना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळेच महिना दोन महिन्याने भाजप नेते सरकार जाणार असल्याचं भाकितं करत असतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (uddhav thackeray government will collapse, acharya tushar bhosale predictions failed)

संबंधित बातम्या:

‘काऊंटडाऊन सुरु झालाय; उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल’

शरद पवारांच्या नातवाचा पराभव केला, ‘मावळ’चा गड राखला; कोण आहेत खासदार श्रीरंग बारणे?

अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर 7 दिवस कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे, पाटलांची सूचना

(uddhav thackeray government will collapse, acharya tushar bhosale predictions failed)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.