ठाकरेंचा खास आमदार शिंदेंच्या मंत्र्यासोबत, लवकरच आणखी मोठा धक्का? फोटो तुफान व्हायरल!

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांची विधानभवाच्या परिसरात भेट होत राहते. वरिष्ठ नेत्यांपासून ते आमदारांपर्यंतचे नेते हे राजकीय वैर विसरून एकमेकांच्या भेटी घेतात. सध्या मात्र पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने एक साधा फोटोदेखील राजकारणात चर्चेचा विषय ठरतो आहे.

ठाकरेंचा खास आमदार शिंदेंच्या मंत्र्यासोबत, लवकरच आणखी मोठा धक्का? फोटो तुफान व्हायरल!
uddhav thackeray and pravin swami
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 3:05 PM

Uddhav Thackeray MLA Pravin Swami : राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्या आहेत की कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा सहा खासदार बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झाले. त्यानंतर ठाकरे गटाचेच नेते तथा ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. आगामी काळात ठाकरेंचे आणखी काही आमदार हे शिंदे गटात जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला जातोय. त्यासाठी ऑपरेशन टायगर चालू झाल्याचेही शिंदे गटातील नेते सांगत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आणखी एक आमदार अचानक चर्चेत आला आहे. या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

प्रताप सरनाईक यांच्यासोबत फोटो, का होतेय चर्चा

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांची विधानभवाच्या परिसरात भेट होत राहते. वरिष्ठ नेत्यांपासून ते आमदारांपर्यंतचे नेते हे राजकीय वैर विसरून एकमेकांच्या भेटी घेतात. सध्या मात्र पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने एक साधा फोटोदेखील राजकारणात चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण

या फोटोमध्ये प्रवीण स्वामी तसेच प्रताप सरनाईक दिसत आहेत. विधानभवन परिसरातील हा फोटो आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी ‘परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव ना. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या समवेत’ असे कॅप्शन दिलेले नाही. त्यांच्या याच फोटोची सगळीकडेच चर्चा होत आहे. काही लोकांनी ‘हे पण शिंदे गटात गेले का?’ अशा आशयाची मिश्कील टिप्पणी केली आहे. दरम्यान, प्रवीण स्वामी यांनी प्रताप सरनाईक यांच्यासोबतचा फोटो अपलोड केलेला असला तरी त्यातून कोणत्याही राजकीय निर्णयाची पुष्टी होत नाहीये. परंतु हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, हे मात्र नक्की!

Follow Us