मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

कल्याण (ठाणे) : श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे भगव्य युतीला मत आणि श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेसाठी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

कल्याण (ठाणे) : श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे भगव्य युतीला मत आणि श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेसाठी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. याआधी लातुरातील औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावाने जाहीरिरित्या मतं मागितली होती. आता सैनिकांच्या नावे मतं मागणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रांगेत उद्धव ठाकरेही जाऊन बसले आहेत.

“देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असाल, तर मग हे सगळे कशासाठी, देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणाऱ्याला निवडणूक लढवायचा अधिकार असता कामा नये. देशद्रोहाचा खटला रद्द करणार सांगणाऱ्याला निवडणूक लढण्याचा अधिकार असता कामा नये. हीच निवडणुकीची खरी आचार संहिता असेल.”, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातुरातील औसा येथील सभेत सैनिकांच्या नावाने मतं मागितली होती.

“पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी आवाहन करतो की, तुम्ही तुमचं पहिलं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना? तुम्ही तुमचं पहिलं मतदान पुलवामात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना?” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावे मतांचा जोगवा मागितला आहे.

संबंधित बातमी  : लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

तसेच, पहिलं मत देशासाठी द्या, पहिलं मत देश कणखर करण्यासाठी द्या, पहिलं मत देशात कणखर सरकार बनवण्यासाठी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

एकीकडे निवडणूक आयोगन सैन्याचा फोटो किंवा त्यांच्या उल्लेख प्रचारात टाळण्याचं आवाहन करत असताना, थेट देशाच्या पंतप्रधानांनीच निवडणूक आयोगाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच रांगेत जाऊन बसले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *