AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?” राणेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष सवाल

महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?" असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

VIDEO | मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? राणेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नारायण राणे
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 01, 2021 | 8:02 AM
Share

बुलडाणा : “साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?” असा सवाल केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता केला.

काय म्हणाले नारायण राणे?

“साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?” असा टोला नारायण राणे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? असा सवालही राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थितांना मार्गदशन करत होते. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी आहेत, असेही राणे म्हणाले.

“आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवायचा नाही”

गोरगरिबांसाठी पंतप्रधानांनी सात वर्षांत अनेक योजना दिल्या. शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान देण्याचे काम केले. आरोप प्रत्यारोपांमध्ये आम्हाला वेळ घालवायचा नाही. समाजातील प्रत्येक नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल. त्यांचे जीवनमान कसे उंचावेल, त्यांची प्रगती कशी होईल, शिक्षण, आरोग्य अशा सुविधा सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं राणे म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

राणे-ठाकरेंमध्ये ठिणग्या

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण पट्टा पिंजून काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह विधान केले होते. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. त्यानंतर राणेंवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘मुंबई’च्या उद्धव ठाकरेंचे ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंना खास ‘पुणे’री टोमणे!

मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले : नारायण राणे

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत