मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले : नारायण राणे

राणेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच 'मंचावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे' असं म्हटलं. पुढे मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले, असं गुपितही राणेंनी सांगितलं.

मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले : नारायण राणे
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग :  बहुचर्चित सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. कारण त्याअगोदर कोनशिलेच्या अनावरण प्रसंगी उद्धव ठाकरेंनी ना राणेंकडे पाहिलं होतं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांची भाषण झाल्यानंतर नारायण राणे यांचं नाव भाषणासाठी जाहीर झालं. राणेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मंचावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे’ असं म्हटलं. पुढे मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले, असं गुपितही राणेंनी सांगितलं.

व्यासपीठावर येण्यापूर्वी मला मुख्यमंत्री भेटले. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो…, असं नारायण राणे म्हणाले. पण तो एक शब्द कोणता, हे मात्र नारायण राणे यांनी सांगितलं नाही. त्यामुळे राणेंच्या कानात मुख्यमंत्री नेमका कोणता शब्द बोलले हे मात्र काही समोर आलं नाही. सगळया महाराष्ट्राला तो एक शब्द कोणता, याची उत्सुकता लागली आहे.

बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं, तेव्हाच ठरवलं, इथला विकास आपण करायचा!

पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावाबाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा.

उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेने मी हे सगळं काही!

उद्धवजी, हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.

हे सगळं राणेंचं योगदान, दुसरा तिसरा कुणी इथे येऊच शकत नाही!

साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.

उद्धवजी, विमानतळाला विरोध करणारे सध्या मंचावर!

सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा…

विमानतळावर उतरल्यानंतर लोकांनी खड्डे पाहावे का?

कोण काम अडवत होतं, कोण आंदोलन करत होतं… आहेत स्टेजवर. तुम्ही समजता तसं नाही. तुम्ही आलात मला बरं वाटलं, आनंद वाटला. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी टाटांच्या अहवालाचा अभ्यास करावा. विकासासाठी पैसा द्यावा. धरणाला एक रुपया दिला जात नाही. धरणाचं काम अजून पूर्ण नाही. कसला विकास… विमानतळावर लोकांनी आल्यावर काय पाहावं.

विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय?

मला आज कळलं विमानतळाचे मालक कोण? म्हसकर गेले आणि दुसरे आले. विनायक राऊतांनी स्टेजवरुन सांगितलं. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय? बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही.

आदित्य,  उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल

मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण, वीरेंद्र म्हस्कर गेले आणि दुसरे आले. स्टेजवर आलो आणि विनायक राऊतांनी सांगितल, म्हटलं कार्यक्रम कुणाचा, mIDC चा आहे, म्हस्कर साहेबांचा आहे, काय चाललंय, काय प्रोटोकॉल आहे की नाही? मान सन्मान जनता देईल. बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडले नाहीत,. थारा नव्हता. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे, मी बोलणार नाही. मी शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व आलात आनंद आहे.

(Before coming on stage, the Chief Minister Uddhav thackeray said a word in my ear Says Union Minister narayan rane Maharashtra Sindhudurg Chipi Airport inauguration)

हे ही वाचा :

राणे मुख्यमंत्र्यांच्या समोर पहिल्यांदाच म्हणाले, उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे व्यासपीठावर एकत्र, रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी, म्हणाले…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI