AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपी, बिहारींचा सगळ्यांनाच ताण, नोकरीत भूमीपुत्रांनाच प्राधान्य : कमलनाथ

भोपाळ : यूपी, बिहारच्या लोकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवशी केलं. यावरुन राजकारण तापलं. पण कमलनाथ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यूपी, बिहारींची समस्या देशभरात आहे. स्थानिकांनाच प्राधान्य मिळायला हवं, असं ते म्हणाले. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. सहा तासात शेतकऱ्यांची […]

यूपी, बिहारींचा सगळ्यांनाच ताण, नोकरीत भूमीपुत्रांनाच प्राधान्य : कमलनाथ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

भोपाळ : यूपी, बिहारच्या लोकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवशी केलं. यावरुन राजकारण तापलं. पण कमलनाथ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यूपी, बिहारींची समस्या देशभरात आहे. स्थानिकांनाच प्राधान्य मिळायला हवं, असं ते म्हणाले.

कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. सहा तासात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तर स्थानिकांना रोजगार मिळावी यासाठीही निर्णय घेतला. शासकीय सवलती अशा कंपन्यांना मिळतील, जिथे स्थानिकांना किमान 70 टक्के रोजगार मिळेल, असं त्यांनी कार्यालयात पाऊल ठेवल्यानंतर पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं.

कमलनाथ यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला. यूपी, बिहारींमुळे रोजगार मिळत नाही, असं ते म्हणाले. यावर उत्तर भारतीय नेत्यांपासून ते भाजपपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिली आणि कमलनाथ यांच्यावर टीका केली. पण कमलनाथ यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. वाचा राज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना ‘नो एंट्री’

राहुल गांधी काय म्हणाले?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं ते म्हणाले. शिवाय कमलनाथ यांच्याबाबत याविषयी चर्चा करु असंही राहुल गांधींनी सांगितलं.

दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

कर्जमाफीच्या आश्वासनाने काँग्रेसला तीन राज्यात सत्ता मिळवून दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. 31 मार्च 2018 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. सत्ता आल्यास दहा दिवसात कर्जमाफी करु असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं होतं. वाचा –  कमलनाथांनी यूपी, बिहारींना रोखलं, पण राहुल गांधी म्हणतात…

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे उत्तर भारतीयांसाठी नेहमीच आंदोलन करत असतात. मनसेच्या परप्रांतियांच्या प्रत्येक मुद्द्याला संजय निरुपम यांचा विरोध असतो. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या सरकारने यूपी, बिहारींना एका प्रकारे राज्यात येण्यास अप्रत्यक्ष बंदीच घातली आहे.

महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत बिहारींना नोकरी असो, किंवा राज्यातल्या कंपन्यांमध्ये अनेक परप्रांतियांना नोकरी असो. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक मात्र रोजगारापासून वंचित राहतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी कमलनाथ यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यासाठीच नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...