AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमलनाथांनी यूपी, बिहारींना रोखलं, पण राहुल गांधी म्हणतात…

नवी दिल्ली : रोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरु केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीही एक फाईलवर त्यांनी सही केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. “गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू […]

कमलनाथांनी यूपी, बिहारींना रोखलं, पण राहुल गांधी म्हणतात...
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली : रोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरु केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीही एक फाईलवर त्यांनी सही केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.

“गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू होईल, जेव्हा नोकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील लोकांना 70 टक्के जागा दिल्या जातील. बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक इथे येतात, त्यांना रोजगार मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळत नाही. यासंबंधी एका फाईलवर मी सही केली आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं. वाचा राज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना ‘नो एंट्री’

कमलनाथ यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं ते म्हणाले. शिवाय कमलनाथ यांच्याबाबत याविषयी चर्चा करु असंही राहुल गांधींनी सांगितलं.

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे उत्तर भारतीयांसाठी नेहमीच आंदोलन करत असतात. मनसेच्या परप्रांतियांच्या प्रत्येक मुद्द्याला संजय निरुपम यांचा विरोध असतो. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या सरकारने यूपी, बिहारींना एका प्रकारे राज्यात येण्यास अप्रत्यक्ष बंदीच घातली आहे.

महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत बिहारींना नोकरी असो, किंवा राज्यातल्या कंपन्यांमध्ये अनेक परप्रांतियांना नोकरी असो. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक मात्र रोजगारापासून वंचित राहतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी कमलनाथ यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यासाठीच नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.

Follow Us
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?