Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपीच्या मजुरांचा शिवसेना-काँग्रेस सरकारकडून छळ, ठाकरेंना माणुसकी क्षमा करणार नाही : योगी

आपल्या रक्ताचं पाणी करुन महाराष्ट्राला मदत करणाऱ्या कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला (Uttar Pradesh CM Yogi Adityanath slams Uddhav Thackeray for leaving UP Migrants)

यूपीच्या मजुरांचा शिवसेना-काँग्रेस सरकारकडून छळ, ठाकरेंना माणुसकी क्षमा करणार नाही : योगी
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 7:48 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत. महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath slams Uddhav Thackeray for leaving UP Migrants)

“आपल्या रक्ताचं पाणी करुन महाराष्ट्राला मदत करणाऱ्या कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. लॉकडाऊनमध्ये त्यांना फसवले गेले. त्यांना वाईट अवस्थेत सोडून देण्यात आले आणि घरी जाण्यास भाग पाडले गेले. श्रीयुत उद्धव ठाकरे, या अमानुष वर्तनाबद्दल माणुसकी कधीही तुम्हाला क्षमा करणार नाही” असा तोरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिरवला.

“आपल्या घरी पोहोचलेल्या सर्व बंधू-भगिनींची उत्तर प्रदेशात काळजी घेतली जाईल. आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याची नाटक करु नका. सर्व कामगारांना विश्वास आहे की आता त्यांची जन्मभूमी त्यांची काळजी घेईल, शिवसेना आणि कॉंग्रेस निर्धास्त रहा” असा घणाघातही योगींनी केला आहे.

“संजय राऊतजी, भुकेलेला मुलगा फक्त आपल्या आईला शोधतो. महाराष्ट्र सरकारने अगदी ‘सावत्र आई’ म्हणून पाठिंबा दर्शवला असता, तरी महाराष्ट्राला हातभार लावणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रहिवाशांना मूळगावी परत यावे लागले नसते.” असंही योगी म्हणाले.

हेही वाचा : पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा

(Uttar Pradesh CM Yogi Adityanath slams Uddhav Thackeray for leaving UP Migrants)

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.