AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वंचित’ची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ३० नवीन उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात विविध जाती-जमातींचे प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत वंचितने एकूण ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत उमेदवारांच्या नावांसह त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे, ज्यामुळे सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यात आला आहे. धुळे, सिंदखेडा, उमरेड आदी मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

'वंचित'ची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
प्रकाश आंबेडकर
| Updated on: Oct 16, 2024 | 10:07 PM
Share

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 30 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 10 उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे वंचितकडून आतापर्यंत 51 उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. धुळे शहर मतदारसंघासाठी जितेंद्र शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते बौद्ध समाजाचे असल्याचं प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. सिंदखेडा मतदारसंघातून राजपूत समाजाचे भोजासिंग तोडरसिंग रावल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमरेड मतदारसंघातून बौद्ध समाजाचे सपना राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बल्लारपुर मतदारसंघातून कुणबी समाजाचे सतीश मुरलीधर मालेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चिमुर विधानसभा मतदारसंघातून माना समाजाचे अरविंद आत्माराम सदिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. किनवट मतदारसंघातून प्रा. विजय खुपसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते आंध-आदिवासी समाजाचे आहेत. नांदेड उत्तरमधून गौतम दुथडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

देगलूर विधानसभा मतदारसंघातून बौद्ध धर्माचे सुशील कुमार देगलूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाथरी मतदारसंघासाठी विठ्ठल तळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते माळी समाजाचे आहेत. परतूर – आष्टी मतदारसंघातून माळी समाजाचे रामप्रसाद थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. घनसावंगी येथून कावेरीताई बळीराम खटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जालना येथून डेव्हिड धुमारे, बदनापुर येथे सतीश खरात, देवळाली अविनाश शिदि, इगतपुरी येथे भाऊराव काशिनाथ डगळे, उल्हासनगर येथे डॉ. संजय गुप्ता, अणुशक्ती नगर येथे सतीश राजगुरू, वरळीत अमोल आनंद निकाळजे, पेणमध्ये देवेंद्र कोळी, आंबेगाव मतदारसंघात दिपक पंचमुख, संगमनेर येथे अझीज अब्दुल व्होरा, राहुरी येथे अनिल भिकाजी जाधव, माजलगाव मतदारसंघातून शेख मंजूर चांद, लातुर शहर मतदारसंघातून विनोद खटके, तुळजापूर येथे डॉ. स्नेहा सोनकाटे, उस्मानाबाद येथे प्रणित शामराव डिकले, परंडा मतदारसंघात प्रविण रणबागुल, अक्कलकोट येथे संतोषकुमार खंडू इंगळे, माळशिरसमध्ये राज यशवंत कुमार आणि मिरज मतदारसंघात विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.