Video : दत्तामामा चुकून चुकले! मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, भर सभेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा उल्लेख!

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलाय! जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली.

Video : दत्तामामा चुकून चुकले! मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, भर सभेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा उल्लेख!
राज्यमंत्री भरणे यांनी पाटील यांच्यावर केली सडकून टिका.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:07 AM

इंदापूर : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन होऊन दोन वर्षे उलटली. या काळात सरकारमधील प्रमुख आणि चर्चेतील चेहरे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अशा ठराविक नेत्यांची नावं आपल्याला घेता येतील. मात्र, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane)यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलाय! जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली.

आज इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये काही काळ खळबळ आणि हशाही पिकला! तेव्हा भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

इंदापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. असं असुनही त्यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचा विसर पडला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी विकासनिधी देताना कायम हात सैल ठेवला होता. त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव आलं, अशीही चर्चा खासगीत रंगत आहे. तर दुसरीकडे माणूस आहे, त्यात दत्तामामांच्या मागे मोठा व्याप आहे. त्यामुळे झाली असेल चूक, असंही इंदापुरातील लोक म्हणत आहेत.

इतर बातम्या :

Video : बुलडाण्यातल्या भयानक अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, एसटी आली आणि उडवून…

Ahmednagar CCTV : व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करताच झाले पसार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.