AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election Results 2022: महाराष्ट्राच्या राजकारणाचा देवेंद्रच चाणक्य, मविआ उभी फोडली, पवार, ठाकरेंना आस्मान, वाचा 5 अँगल

Vidhan Parishad Election Results 2022: राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे चारही नेते सक्रिय झाले होते.

Vidhan Parishad Election Results 2022: महाराष्ट्राच्या राजकारणाचा देवेंद्रच चाणक्य, मविआ उभी फोडली, पवार, ठाकरेंना आस्मान, वाचा 5 अँगल
महाराष्ट्राच्या राजकारणाचा देवेंद्रच चाणक्य, मविआ उभी फोडलीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2022 | 10:58 PM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार नाही. एखाद्यावेळी निकाल इकडं तिकडं झाला म्हणजे आस्मान कोसळलं नाही, असं आघाडीचे नेते सांगत होते. विधान परिषद निवडणुकीत  (Vidhan Parishad Election Result 2022) आमचे सर्व नेते निवडून येतील. कुणी कुणाला आणि कसं मतदान करायचं हे सर्व ठरलं आहे, असंही आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे चाणक्य आहेत. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे सोबतच्या माणसालाही कळत नाही, अशी स्तुती सुमने भाजपकडून (bjp) फडणवीसांवर उधळली जात होती. फडणवीसांनी आपल्या पक्षातील नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवत पुन्हा एकदा पवार आणि ठाकरे या आघाडीच्या धुरंधर नेत्यांना आस्मान दाखवलं आहे. आपणच महाराष्ट्रातील राजकारणातील चाणक्य असल्याचं फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. या निकालाने केवळ फडणवीस यांची प्रतिमा उंचावलेली नाही तर आघाडीला प्रचंड मोठी चपराक बसलेली आहे.

लाड यांना विजयी करण्याचा चमत्कार

भाजपने निवडणुकीच्या मैदानात पाचवा उमेदवार उतरवला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. संख्याबळ नसताना पाचवे उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना निवडणूक मैदानात उतरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चार उमेदवारांच्या मतांची जुळवाजुळव केल्यानंतर लाड यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली. यशस्वी रणनीती, संवाद आणि प्रत्यक्ष भेटीच्या बळावर फडणवीस यांनी लाड यांना निवडून आणलं. या निवडणुकीत लाड यांना 17 मते मिळाली आहेत.

मविआची 21 मते फुटली

या निवडणुकीत महाविकास आघाडीची 21 मते फुटली आहेत. महाविकास आघाडीच्या अपक्षांची मते आपल्याकडे वळवतानाच खुद्द महाविकास आघाडीतील पक्षांच्या आमदारांची मतेही आपल्याकडे खेचून आणण्यात फडणवीसांना यश आलं आहे. आता आघाडीतील कोणत्या आमदारांची मते फुटली हे अद्याप हाती आलं नाही. मात्र, 21 मते फुटणं ही आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे. या निकालावरून अपक्ष आमदार सत्ताधारी पक्षासोबत खूश नसल्याचं दिसून आलं आहे.

शिवसेनेची तीन मते फोडली

फडणवीसांची दुसरी खेळी यशस्वी ठरली. ती म्हणजे सेनेची मते फोडण्याची. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. वास्तविक ही सर्व मते शिवसेनेच्या आमदारांना पडणं अपेक्षित होतं. पण शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी 26 मते पडली. म्हणजे तीन मते त्यांना पडलीच नाही. ही तीन मते भाजपला पडल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे शिवसेनेला त्यांच्या बाजूने असलेल्या अपक्षांची मते मिळाली नाहीत. बच्चू कडू हे शिवसेनेच्या कोट्यातील मंत्री आहेत, त्यांचीही दोन मते, यशवंत गडाख यांचे एक मत आणि इतर अपक्षांची मतेही शिवसेनेला मिळालेली दिसत नाहीये. त्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेत गद्दार मनाचा कुणीच राहिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं होतं आणि आज फडणवीस यांनी सेनेलाच खिंडार पाडल्याचं दिसून आलं आहे.

पवारांच्या विधानाकडे दुर्लक्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक विधान केलं होतं. फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश आलं आहे. त्यांचा हा चमत्कार मान्य करावा लागेल, असं पवार म्हणाले होते. पवारांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झालाय असं अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. विधान परिषद निवडणुकीतही अशा प्रकारचा धोका होऊ शकतो असा त्यामागचा अर्थ होता. तरीही आघाडीचे नेते गाफिल राहिले. केवळ आकड्यावरून सर्व काही अलबेल असल्याचं त्यांना वाटलं अन् तिथेच घात झाला.

ना ठाकरे, ना दादा

राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे चारही नेते सक्रिय झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही मुंबईत तळ ठोकला होता. मात्र, या सर्व नेत्यांची डावपेच उधळून लावत फडणवीस यांनी आपणच चाणक्य असल्याचं दाखवून दिलं आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.