पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिलाय.

पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

पुणे : जिल्ह्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलाय. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिलाय.(Vijay Shivtare criticizes Sharad Pawar from Purandar’s proposed airport)

पुरंदरचं विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत, असा इशाराच शिवतारे यांनी दिला आहे.

प्रस्तावित विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला पुन्हा स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, नावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याच्या चर्चा आहेत. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी शनिवारी राजुरी इथं सर्व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळाला विरोध दर्शवला आहे.

पवारांनी डिसेंबरमध्ये घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

पुण्यापासून जवळच पुरंदर येथे नवं विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारनं मांडला आहे. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावं यासाठी 9 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह, संरक्षण सचिव व नागरी उड्डाण सचिव उपस्थित होते.या बैठकीचे काही फोटो स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले होते.

संबंधित बातम्या :

Photo : पुरंदरमध्ये विमानतळाचा प्रस्ताव, शरद पवारांकडून केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

…आणि पवारांनी फेसबूकचा डीपी बदलला !

Vijay Shivtare criticizes Sharad Pawar from Purandar’s proposed airport

Published On - 7:40 pm, Sun, 24 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI