मोठी बातमी! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, विलिनीकरण नव्हे तर…. बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ

प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचा दावा केला आहे. पक्षात मोठी उलथापालथ होण्याचे संकेतही त्यांनी दिले. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, याकडे लक्ष लागलं आहे.

मोठी बातमी! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, विलिनीकरण नव्हे तर.... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
NCP ajit pawar News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 4:44 PM

दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचा मोठा दावा काँग्रेसन नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मोठे गट पडले असल्याचा दावा वडेट्टीवारांचा दावा असून त्यांच्या या दाव्यानंतर आता एकच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज वडेट्टीवारांनी हा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा थोड्या प्रमाणात थंडावल्या होत्या. दोन्ही गटांच्या बाजूंनी नेत्यांनी विलिनीकरण आता शक्य नाही, असा दावा केला होता. त्यामुळे हा मुद्दा काहीसा मागे पडला होता. पण आता अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर जवळपास अनेक महिन्यांनी काँग्रेसमधून असा मोठा दावा करण्यात आला आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?

अजित दादांच्या पक्षामध्ये मोठं काहीतरी होईल, अजित दादा नसताना आता काहीतरी मोठी उलथापलथ होईल असं मला एकूण चित्र दिसतंय. त्या पक्षामध्ये मला आतातरी दोन उभी गटं पडल्याचे समोर येतंय. भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे, जो भांडणं लावून स्वतःचा स्वार्थ साधण्यामध्ये फार मोठा तरबेज आहे. बीजेपीला जुमलेबाजांचा पक्ष म्हणता येईल, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती पूर्णपणे चांगली आहे. पण अनेक राजकीय नेते त्यांची भेटल घेत आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घडणाऱ्या घडामोडींकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काही घडणार, की फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठे गट पडणार, त्यामध्ये पुढे नेमके कसे चित्र येणार? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us