AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार इच्छुक, दिल्लीत के सी वेणूगोपालांशी चर्चा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली (Vijay Wadettiwar meets K C Venugopal)

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार इच्छुक, दिल्लीत के सी वेणूगोपालांशी चर्चा
| Updated on: Jan 12, 2021 | 2:17 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. (Vijay Wadettiwar discusses with K C Venugopal over Congress Maharashtra State President)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोलेही शर्यतीत

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईचा फॉर्म्युला वापरणार?

काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. या फॉर्म्युलानुसार प्रदेशाध्यक्ष न होऊ शकलेल्या नेत्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तसेच प्रदेशाध्यक्षासह चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

(Vijay Wadettiwar discusses with K C Venugopal over Congress Maharashtra State President)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.