AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही, नोटिफिकेशन काढा”

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही, नोटिफिकेशन काढा
विनायक मेटे, नेते, शिवसंग्राम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 09, 2021 | 4:37 PM
Share

औरंगाबाद : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. तसेच केवळ सामनात किंवा सोशल मीडियावर संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही, तर सरकारने नोटिफिकेशन काढावं, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेवर या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आणि लोकांचा बळी घेत असल्याचाही आरोप केला (Vinayak Mete criticize MVA leaders over Aurangabad and Maratha Reservation issue).

विनायक मेटे म्हणाले, “सामना दैनिकात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिलं म्हणजे नाव बदलत नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं. नोटिफिकेशन काढा आणि मग बघा काँग्रेस विरोध करतं का? आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून अशी स्थिती शिवसेनेची झाली आहे. लोकांना एकमेकांच्या अंगावर घालण्याचं काम शिवसेना करत आहे.”

“राजकारण करण्यासाठी नगरसेवक वाढवण्यासाठी शिवसेना राजकारण करत आहे आणि लोकांचा बळी घेत आहे. मंत्री विजय वडेट्टीवरांनी मेळावा घेतला आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात मारामारी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी इमानदारीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण ज्या मुस्लिमांच्या जीवावर काँग्रेस राष्ट्रवादीने राजकारण केलं,” असंही विनायक मेटेंनी सांगितलं. तसेच महाविकासआघाडी मुस्लिमांना आरक्षण का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.

‘शिवसंग्राम राज्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार’

राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसंग्राम पक्ष लढवणार आहे, अशीही घोषणा विनायक मेटे यांनी केली. भाजपने सन्मानजनक वागणूक दिली, तर युती करू नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढवणार आहे. युती होईल न होईल पण दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्या शिवाय थांबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

‘अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ’

विनायक मेटे म्हणाले, “अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबतीत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. ते आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही. त्यांच्या अकर्तृत्वानपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परवा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना बोलावलं नाही, त्यांच्याही लक्षात आलं हे अकार्यक्षम आहेत. पण सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. अशोक चव्हाण यांना किंमतच दिली नाही. त्यामुळे ते विनायक मेटे यांना फटकारले म्हणून माझ्याविरोधात बातम्या पेरत आहेत.”

आता म्हणतात केंद्राने निर्णय घ्यावा. हे केंद्राने करायचं तर मग तुम्ही काय खुर्च्या उबवता का? असा सवाल विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांना केला.

हेही वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- आ. विनायक मेटे बैठक संपली, वाचा कोणत्या मुद्द्यांवर चर्चा….

मराठा समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री-विनायक मेटे यांच्यात बैठक, ‘या’ मुद्यांवर चर्चा होणार

पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार, अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा

Vinayak Mete criticize MVA leaders over Aurangabad and Maratha Reservation issue

Follow Us
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया